AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रम आणि व्हिस्कीपेक्षा जिन किती वेगळी असते? अल्कोहोलचे प्रमाण कमी की जास्त? वाचा…

Gin Alcohol : तुमच्यापैकी अनेकांनी जिन, रम, व्हिस्की, व्होडका आणि इतर प्रकारचे मद्य प्यायले असेल. अनेक मद्यप्रेमींना वाटते की, जिन ही स्ट्राँग असते, आज आपण यामागील कारण जाणून घेणार आहोत.

रम आणि व्हिस्कीपेक्षा जिन किती वेगळी असते? अल्कोहोलचे प्रमाण कमी की जास्त? वाचा...
gin vs whiskey vs rumImage Credit source: Google
| Updated on: Dec 06, 2025 | 10:05 PM
Share

दारूच्या दुकानात तुम्हाला जिन, रम, व्हिस्की, व्होडका आणि इतर प्रकारचे मद्य पहायला मिळते. या सर्व प्रकारच्या दारू एकाच ठिकाणी मिळत असल्या तरी त्यांची बनवण्याची पद्धत खूप वेगळी आहे. तसेच चव आणि किंमतीतही खूप जास्त फरक असतो. अनेक मद्यप्रेमींचं असं म्हणणं आहे की, जिन ही बॉटनिकल फ्लेवरमुळे स्ट्राँग असते. मात्र या मागील सत्य वेगळे आहे. आज आपण जिन, रम आणि व्हिस्कीमधील फरक काय आहे याची माहिती जाणून घेणार आहोत.

जिनची चव खास

जिनची खास चव ही ज्युनिपर बेरीपासून येते. जिनचा सुगंध फ्रेश पाइनसारखा असतो. असा सुगंध इतर कोणत्याही पेयाला नैसर्गिकरित्या मिळत नाही. जिनचा मुळ घटक हा न्यूट्रल ग्रेन स्पिरिट आहे, मात्र त्यात कालांतराने धणे, लिंबाची साल आणि वेलची सारखे पदार्थ टाकले जातात. त्यामुळे याची चव रम किंवा व्हिस्कीपेक्षा अधिक सुगंधी असते.

रम आणि व्हिस्की

रम हे एक वेगळे पेय आहे, याची निर्मिती उसाच्या रसापासून किंवा मोलॅसिसपासून बनवली जाते. यामुळे रमला नैसर्गिक गोडवा मिळतो. यात कारमेल, ट्रेकल, केळी किंवा इरत फळांसारखे सुगंध टाकता येतात. व्हिस्की ही बार्ली, मका, राई किंवा गहू यांसारख्या धान्यांपासून बनवली जाते. मात्र व्हिस्कीला खरी चव ही लाकडी बॅरल मुळे येते. लाकडाच्या संपर्कात आल्यामुळे याची चव तर वाढतेच शिवाय रंग अधिक गडद बनतो.

जिन हे पेय डिस्टिलेशननंतर लगेच बाटलीत बंद केले जाते, तर रम आणि व्हिस्की किती जास्त दिवस बॅरलमध्ये साठवली जाते त्यावर त्याची चव अवलंबून असते. जिनला बॉटनिकल्ससह पुन्हा डिस्टिल्ड केले जाते, ज्यामुळे तिला आणखी सुगंध येतो. तर रम उसापासून फर्मेंटेशनद्वारे बनवली जाते. तर व्हिस्कीमध्ये माल्टिंग, मॅशिंग, फर्मेंटेशन याच्यासह साठवणूकीचा समावेश असतो.

जिन अधिक स्ट्राँग

अनेक मद्यप्रेमींना वाटते की जिन अधिक स्ट्राँग आहे, मात्र बहुतेक जिन, रम आणि व्हिस्की ब्रँड 40% ABV वर बाटलीबंद केले जातात. याचाच अर्थ या तिन्हीपैकी कोणत्याही मद्यात नैसर्गिकरित्या अल्कोहोल जास्त नसते. मात्र जिनच्या कडक चवीमुळे ती इतर मद्यांपेक्षा थोडी स्ट्राँग वाटू शकते.

Follow Us
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये..
युद्धाचा मोठा फटका गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची गर्दी विविध शहरांमध्ये...
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक
मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ कुंभमेळा समितीची बैठक.
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत
पिंपरी-चिंचवडमध्ये गॅस टंचाईचा फटका; केटरिंग व्यवसाय अडचणीत.
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद
गॅस तुटवड्यावर पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद.
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा
नागपुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा.
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त
बीडमध्ये घरगुती गॅस वापरणाऱ्या हॉटेल्सवर छापेमारी; 28 सिलेंडर जप्त.
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम
हिंगोलीत गॅस तुटवडा; व्यावसायिक सिलेंडर बंद, स्वीटमार्ट परिणाम.
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला
रमजान महिना सुरु; मुंबईचा मोहम्मद अली रोड खवय्यांनी गजबजला.
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे..
भरत जाधव, पुष्कर श्रोत्री आणि केदार शिंदेंसह अनेक कलाकार बनले मनसेचे...
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका
इराण-अमेरिका-इस्त्रायल युद्धाचा डोंबिवली MIDC उद्योगांना मोठा फटका.