Vastu Tips: लाफिंग बुद्धा घरात नेमका कुठे ठेवाल?

| Updated on: May 10, 2022 | 4:16 PM

लाफिंग बुद्धा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार ठेवल्याने जीवनातील सर्व त्रास संपतात. वास्तुशास्त्रानुसार घरात लाफिंग बुद्धा ठेवणं शुभ मानलं जातं.

Vastu Tips: लाफिंग बुद्धा घरात नेमका कुठे ठेवाल?
Follow us on

घरात लाफिंग बुद्धा कुठेही ठेवू नये. एक्सपर्टसच्या मते लाफिंग बुद्धा ठेवण्यासाठी योग्य दिशा कोणती हे माहिती असणं गरजेचं आहे. आम्ही तुम्हाला तुम्ही घरात लाफिंस बुद्धा घरात कुठे ठेवू शकता हे सांगणार आहोत.लाफिंग बुद्धा वास्तुशास्त्राच्या नियमानुसार ठेवल्याने जीवनातील सर्व त्रास संपतात. भले ही लाफिंग बुद्धाचा मुख्य संबंध चीनी शास्त्र फेंगशुई बरोबर आहे. भारतीय वास्तुशास्त्रात देखील याचे महत्व सांगितले गेले आहे. वास्तुशास्त्रानुसार घरात लाफिंग बुद्धा ठेवणं शुभ मानलं जातं. भारतीय वास्तुशास्त्रानुसार घरात लाफिंग बुद्धा (Laughing Buddha Tips)ठेवल्याने सुख (Happiness In Life) समृद्धि येते. लाफिंग बुद्धाचा संबंध धनसंपत्तीशी असतो. लाफिंग बुद्धा घरात ठेवल्याने आर्थिक समस्या (Financial Problem)दूर होतात. इतकंच नाही तर लोक घरा व्यतिरिक्त व्यापारात लाभ मिळविण्यासाठी कामाच्या ठिकाणी लाफिंग बुद्धा ठेवतात. गुडलक म्हणून गिफ्टही दिला जातो.

लाफिंग बुद्धा महात्मा बुद्धांचे एक जापानी शिष्य होते. जेव्हा त्यांनी बुद्धांकडून शिक्षा प्राप्त करून ते अचानक जोर जोरात हसू लागले. तेव्हापासून त्यांनी त्यांच्या जीवनाचे लक्ष बनवलं की ते जिथे पण असतील लोकांना हसवतील. घरात लाफिंग बुद्धा कुठे ही ठेवला जाऊ शकत नाही. एक्सपर्ट्सच्या मतानुसार लाफिंग बुद्धा ठेवण्यासाठी योग्य दिशेचे ज्ञान माहिती असणं गरजेची आहे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही लाफिंग बुद्धा घरात कुठे ठेवला पाहिजे.

घरात इथे ठेवा लाफिंग बुद्धा

लाफिंग बुद्धाच्या मुर्त्या वेगवेगळ्या प्रकारच्या मिळतात. तुमच्या घरात धनाची कमतरता असेल तर, घरात धनाचं पोतं घेतलेल्या लाफिंग बुद्धाची मूर्ती आणा. अशी मूर्ती घराच्या मुख्य दरवाज्याच्या बरोबर समोर ठेवा. मूर्ती जमीनीपासून 30 इंच किंवा जास्तीत जास्त 32 इंचाच्या उंचीवर ठेवणं चांगलं असतं. असं केल्याने घरातील नकारात्मक एनर्जी दूर होईल आणि धनसंपत्तीचे नवे मार्ग खुले होतील.

इथे ठेवू नका मूर्ती

अनेकदां लोक लाफिंग बुद्धाची मूर्ती अशा ठिकाणी ठेवतात, जी वास्तुशास्त्रानुसार ठिक नसते. लाफिंग बुद्धाची मूर्ती किचन, डायनिंग एरिया, बेडरूम आणि टॉयलेट मध्ये अजिबात ठेवू नये. ही एक प्रकारची चूक असते. अशाने तु्म्हाला आर्थिक संकंटाचा सामना करावा लागू शकतो.

(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)