AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, खासगी सचिवांची…

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच धक्का बसला. अजित पवार यांचा विमान अपघानंतर संशय व्यक्त केला जात आहे. सीआयडीकडून विमान अपघाताची चाैकशी केली जात आहे. आता याबाबत मोठी अपडेट आली.

अजित पवार विमान अपघात प्रकरणात मोठी अपडेट, खासगी सचिवांची...
Ajit Pawar plane crash
| Updated on: Feb 06, 2026 | 11:52 AM
Share

मुंबईहून बारामतीकडे निघाले असताना अजित पवारांच्या विमानाचा बारामती विमानतळाच्या धावपट्टी शेजारी मोठा अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवार गंभीर जखमी झाल्याची माहिती सुरूवातीला देण्यात आली. मात्र, विमान जमिनीवर कोसळताच चार ते पाच मोठे स्फोट झाले. अजित पवार यांना मिळून पाच जण या विमानातून प्रवास करत होते. यापैकी एकही व्यक्त जिवंत राहू शकली नाही. अजित पवार यांच्या विमान अपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला. तांत्रिक बिघाड आणि पायलटला न आलेला अंदाज यामुळे हा विमान अपघात झाल्याचे प्राथमिक अहवालात म्हटले आहे. मात्र, या विमान अपघाताबद्दल अजून पूर्ण चाैकशी होणे बाकी आहे. शेवटच्या क्षणी नक्की काय घडत होते, याचाही माहिती पुढे आली. अजित पवार यांचे विमान धावपट्टीच्या काही अंतरावर असताना कोलमडताना दिसले. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली.

अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणात सरकाकडून सीआयडीची स्थापना करण्यात आली. या विमान अपघात प्रकरणात सखोल चाैकशी व्हावी आणि नेमके कारण काय? हे पुढे यावे ही सर्वांचीच इच्छा आहे. या विमान अपघाताच्या चाैकशी संबंधित अत्यंत मोठी बातमी पुढे येताना दिसत आहेत. अजित पवार यांच्या खाजगी सचिवांकडे सीआयडीने चाैकशी केल्याची माहिती मिळत आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या खाजगी सचिवांची चाैकशी झाली. सीआयडी अधिकाऱ्यांनी खासगी सचिवांकडे अजित पवार यांच्या बारामती दाैऱ्याची संपूर्ण चाैकशी केली. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचा दाैरा कसा होता, ते कुठे कुठे जाणार होते याबाबत सर्व माहिती घेण्यात आली. फक्त हेच नाही तर 27 जानेवारी रोजी रात्री या दाैऱ्याबाबत काही चर्चा अजित पवार यांनी केली होती का? याबाबतही सचिवांना प्रश्न करण्यात आला.

28 जानेवारी रोजीच्या अजित पवार यांच्या प्रवासाचे नियोजन नक्की कोणी केले आणि काय प्लॅनिंग होते, याबाबतची चाैकशी करण्यात आली. सीआयडीचे अधिकारी प्रत्येक बाजूनेत तपास करताना दिसत आहेत. राज्यातील काही नेत्यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत मोठा संशय व्यक्त केला.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?