लग्न मंडपात नवरी नवरदेवाच्या डाव्या बाजूलाच का बसते? उजव्या का नाही?

भारतीय विवाह परंपरेत नवरी नवऱ्याच्या डाव्या बाजूला का बसते? यामागे स्वर विज्ञानाचे गहन रहस्य आहे. इडा (चंद्र) आणि पिंगळा (सूर्य) नाडींच्या ऊर्जा संतुलनासाठी हे स्थान महत्त्वाचे आहे. पत्नीचे डाव्या बाजूला बसणे पती-पत्नीतील ऊर्जा प्रवाहात सामंजस्य साधते, ज्यामुळे दाम्पत्य जीवनात सुख-शांती आणि प्रेम टिकून राहते.

लग्न मंडपात नवरी नवरदेवाच्या डाव्या बाजूलाच का बसते? उजव्या का नाही?
bride
| Updated on: May 25, 2026 | 7:25 PM

भारतीय संस्कृती आणि परंपरेत पत्नीला नेहमी डावं (वाम) स्थान का दिलं जातं हे माहीत आहे का? ही केवळ परंपरा नाही. किंवा बनवलेला नियम नाही. तर मनुष्याच्या श्वासात लपलेल्या विज्ञानाचं हे गूढ आहे. धार्मिक अनुष्ठान, विवाह संस्कार आणि सामाजिक परंपरेतही पत्नीचं स्थान नेहमी नवऱ्याच्या डाव्या बाजूला असते. स्वर विज्ञानाच्या आधारे ही मान्यता केवळ संस्कृती पुरती मर्यादित नाही तर ऊर्जा संतुलन आणि मानसिक सामंजस्याशी संबंधित आहे. त्यामुळे पत्नीला नवऱ्याच्या डाव्या बाजूला नेहमी स्थान दिलं जातं.

स्वर विज्ञान हे प्राचीन भारतीय योग शास्त्राचा महत्त्वाचा भाग आहे. शरीरात प्रवाहित होणारी प्राण ऊर्जा आणि श्वासाच्या स्वरुपाला पाहण्याचा अभ्यास स्वर विज्ञानात केला जातो. यात मुख्यत्वे इडा, पिंगळा आणि सुषुम्ना नाडींचं वर्णन आहे. इडा नाडी शरीराच्या डाव्या भागाशी संबंधित असल्याचं मानलं जातं. त्याला चंद्र स्वरही म्हटलं जातं. शीतलता, संवेदनशीलता, प्रेम, करुणा, मानसिक शांती आणि स्त्रीची ही नाडी प्रतिक आहे. दुसरीकडे पिंगळा नाडी उजव्या भागाशी संबंधित आहे. या नाडीला सूर्य स्वर म्हटलं जातं. ही नाडी ऊर्जा, निर्णय क्षमता आणि क्रियाशीलतेसोबतच पुरुष तत्त्वाचं प्रतिनिधीत्व करते.

स्त्री स्वभावत:च चंद्र ऊर्जेचं प्रतिक मानल्या जाते. त्यामुळेच पत्नीला पतीच्या डाव्या बाजूला स्थान देण्याची परंपरा विकसित झाली. मान्यतेनुसार, पत्नी जेव्हा पतीच्या डाव्या बाजूला असते तेव्हा दोघांची ऊर्जा संतुलित होते. त्यामुळे दाम्पत्य जीवनात सामंजस्य बनून राहतं. कारण या स्थितीत नवऱ्याच्या डाव्या बाजूला इडा म्हणजे चंद्र नाडी आणि पत्नीची सूर्य नाडी म्हणजे पिंगळा नाडी नवऱ्याच्या बाजूला असते. पती-पत्नीच्या दरम्यान चंद्र आणि सूर्य ऊर्जेची ही स्थिती संतान उत्पत्तीमध्ये सहायक ठरते. विवाहा दरम्यान सात फेरे, पूजा पाठ आणि अन्य धार्मिक कार्यक्रमात पत्नीचं स्थान नवऱ्याच्या डाव्या बाजूला ठेवलं जातं.

प्रेम आणि आत्मियतेचं प्रतीक

पत्नीला अर्धांगिनी म्हटलं जातं. त्याचा अर्थ अर्ध अंग असा होतो. इथे वामांगिनी शब्दाचाही प्रयोग केला जातो. यावरून पत्नी नवऱ्याच्या हृदयाच्या जवळ असल्याचं दिसून येतं. मानवी शरीरात हृदय डाव्या बाजूला असंत. त्यामुळे प्रेम, भावना आणि आत्मियतेचं प्रतिक मानलं जातं. याच भावाला स्वर विज्ञानाने ऊर्जा सिद्धांतांच्या माध्यमातून व्याख्यायित केलं आहे. आध्यात्मिक दृष्टीने पाहिलं तर शिव आणि शक्तीचा सिद्धांतही याच संतुलनावर आधारीत आहे. शिव म्हणजे चेतना आणि शक्तीला ऊर्जेच्या रुपात पाहिलं जातं.

जेव्हा दोन्हीचा समन्वय होतो. तेव्हा सृष्टी आणि जीवनाचे संचलन होते. स्वर विज्ञान याच समन्वयाला दाम्पत्य जीवनातही आवश्यक मानते. आधुनिक काळात लोक या परंपरेला धार्मिक रिवाज म्हणून पाहत असले तरी याच्या मागे गहन मनोवैज्ञानिक आणि आध्यात्मिक आधार लपलेला आहे. स्वर विज्ञानानुसार, पती-पत्नीचं हे स्थान केवळ सामाजिक व्यवस्था नाही तर ऊर्जा संतुलन आणि कौटुंबिक सुख, शांतीचं प्रतिकही मानलं जातं.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us