AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! राष्ट्रवादीला धक्का, नवाब मलिक यांच्या पुतणीचे नगरसेवकपद रद्द

Bushra Malik : राष्ट्रवादीला मुंबई महापालिकेत मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 170 मधील नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द झाले आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादीला धक्का, नवाब मलिक यांच्या पुतणीचे नगरसेवकपद रद्द
Bushra Malik NCPImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 10, 2026 | 7:15 PM
Share

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे, राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक 170 मधील नगरसेविका बुशरा नदीम मलिक यांचं नगरसेवक पद रद्द झाले आहे. बुशरा या नवाब मलिक यांची पुतणी असून कप्तान मलिक यांची मुलगी आहे. आतापर्यंत एकूण 4 नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. एक ठाकरे सेना, एका राष्ट्रवादी आणि दोन MIM चे नगरसेवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बुशरा मलिक यांचे नगरसेवकपद रद्द

बुशरा मलिक या राष्ट्रवादी काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांच्या पुतणी आणि कॅप्टन मलिक यांच्या कन्या आहेत. बुशरा मलिक यांची सदस्यता नेमक्या कोणत्या कारणामुळे रद्द करण्यात आली, याची माहिती जात पडताळणी समितीचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे. सध्या कागदपत्र पडताळणीसंदर्भातील एकूण 89 प्रकरणे प्रलंबित असून, त्यापैकी 19 प्रकरणे जात प्रमाणपत्राशी संबंधित आहेत.

रोशन शेख यांचेही पद रद्द

बृहन्मुंबई महानगरपालिकेने गोवंडी येथील प्रभाग क्रमांक 138 मधून निवडून आलेल्या AIMIMच्या नगरसेविका रोशन शेख यांची सदस्यता रद्द केली आहे. जात पडताळणी समितीने त्यांचे ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. महापालिकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, परभणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने 27 एप्रिल 2026 रोजी रोशन शेख यांचे ओबीसी प्रमाणपत्र अवैध ठरवले. हे प्रमाणपत्र नोव्हेंबर 2025 मध्ये जारी करण्यात आले होते.

रोशन शेख यांनी 2026 च्या बीएमसी निवडणुकीत ओबीसी आरक्षित जागेवरून विजय मिळवला होता. मात्र, जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर मुंबई महानगरपालिका अधिनियम, 1888 च्या कलम 16(1C)(a) अंतर्गत त्यांची सदस्यता आपोआप रद्द करण्यात आली. अधिसूचनेनुसार, 27 एप्रिल 2026 पासूनच त्यांची सदस्यता संपुष्टात आले आहे.

शमीर रमजान पटेल यांचेही पद रद्द

समोर आलेल्या माहितीनुसार याआधी AIMIM चे नगरसेवक शमीर रमजान पटेल यांना ओबीसी जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे सदस्यत्व गमवावे लागले होते. जिल्हा जात पडताळणी समितीने त्यांचे प्रमाणपत्र अवैध घोषित केल्यानंतर बीएमसीच्या सर्वसाधारण सभेत महापौर ऋतु तावडे यांनी ते आता नगरसेवक राहिले नसल्याची घोषणा केली होती. शमीर पटेल हे गोवंडीतील प्रभाग क्रमांक 137 मधून ओबीसी आरक्षित जागेवर निवडून आले होते.

यापूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नगरसेवक दीपक सावंत यांचीही याच कारणामुळे सदस्यता रद्द करण्यात आली होती. दीपक सावंत हे भांडुपच्या एस विभागातील प्रभाग क्रमांक 111 मधून ओबीसी आरक्षित जागेवर निवडून आले होते. मात्र काही महिन्यांमध्येच त्यांना पद गमवावे लागले आहे.

Follow Us
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाई...
अभिजीत दीपके आजीच्या अंत्यदर्शनाला मुकले; दिल्ली पोलिसांच्या कारवाईमुळे नातेवाईकांची तीव्र नाराजी
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात
दिल्लीतील 57 मेट्रो स्थानके बंद; सर्वोच्च न्यायालयात गृह सचिवांविरोधात अवमान याचिका! सुनावणी सुरु
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन,
अभिजीत दीपकेंवर 20 हुन अधिक FIR दाखल मात्र 'या' कारणावरून दिलं जामीन, गेल्या 24 तासांत नेमकं काय घडलं?
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच...
अमरावतीच्या अंबादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाचा जल्लोष! पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी