लहान मुलांना का लावला जातो काळा टिका? असे आहे कारण

| Updated on: May 06, 2023 | 10:20 AM

सनातन धर्मातील बहुतेक श्रद्धांमागे वैज्ञानिक तथ्ये सांगितली आहेत. वैज्ञानिक तथ्यांनुसार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मानवी शरीरात असतात परंतु जेव्हा मुलांचा विचार केला जातो तेव्हा..

लहान मुलांना का लावला जातो काळा टिका? असे आहे कारण
काळा टिका
Image Credit source: Social Media
Follow us on

मुंबई : अनेकदा तुम्ही पाहिले असेल की लहान मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी त्यांना काळ्या रंगाचा टिका (Kala Tika) लावला जातो. इतकेच नाही तर  मुलांच्या पायाला काळा दोराही बांधला जातो. धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने मुलावर वाईट शक्तींचा प्रभाव पडत नाही आणि नकारात्मक ऊर्जा मुलापासून दूर राहते. असं म्हणतात की मुलं नाजुक असतात त्यामुळे त्यांना लवकर दृष्ट लागते. काळा टिका लावण्यामागील इतर मान्यता काय आहे ते जाणून घेऊया.

काळा टिका का लावावा

सनातन धर्मातील बहुतेक श्रद्धांमागे वैज्ञानिक तथ्ये सांगितली आहेत. वैज्ञानिक तथ्यांनुसार, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन मानवी शरीरात असतात परंतु जेव्हा मुलांचा विचार केला जातो तेव्हा त्यांच्यामध्ये या रेडिएशनची कमतरता असते. अशा परिस्थितीत जेव्हा एखाद्या व्यक्तीची वाईट नजर मुलांवर पडते तेव्हा मुलांमध्ये असलेल्या या रेडिएशनचा वाईट परिणाम होतो. यानंतर मुलांची तब्येत बिघडायला लागते आणि काही वेळा त्यांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. म्हणूनच असे म्हणतात की जेव्हा काळा टिका किंवा काळा धागा मुलाला बांधला जातो तेव्हा या रेडिएशनचा प्रभाव कमी होते आणि मुलांच्या आरोग्याला फारसा फरक पडत नाही.

अशी आहे धार्मिक भावना

असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पाहते तेव्हा त्याच्या मनात दोन प्रकारचे विचार येतात, एक सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक. एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीकडे नकारात्मक विचाराने पाहिले तर समोरच्या व्यक्तीभोवती नकारात्मक ऊर्जा संचारू लागते. या उर्जेच्या प्रभावामुळे आरोग्यासंबंधी किंवा आर्थिक विकारांसंबंधी अनेक समस्या उद्भवतात, परंतु जेव्हा तुम्ही किंवा तुमची मुले काळा टिळा लावतात किंवा काळा धागा बांधतात तेव्हा ही नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि त्याचा प्रभावापासून त्यांचा बचाव होतो.

हे सुद्धा वाचा

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)