
Reason To Wear Bangles : बहुतांश महिलांना बांगड्या घालणे फार आवडतं आणि ते 16 श्रुंगारांपैकी एक मानलं जातं. यामुळे त्यांच्या हातांचे सौंदर्य तर वाढतेच पण त्यांच्या सौंदर्यातही भर पडते. आपल्या घरातील वडीलधारी मंडळी, मोठ्या बायका या महिलांना बांगड्या घालण्यास अनेकदा प्रोत्साहन देतात, बऱ्याच महिला हातात बांगड्या घालतात. पण हातात बांगड्या घालण्यामागे परंपरा आणि प्रथांच्या पलीकडे वैज्ञानिक कारणे आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का ? चला तर मग बांगड्या घालण्यामागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणे जाणून घेऊया.
काचेच्या बांगड्या घालण्यामागचं धार्मिक कारण
जेव्हा जेव्हा विवाहित महिला काचेच्या बांगड्या घालतात तेव्हा त्यांच्या किणकिण आवाजामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येते. विवाहित महिलांसाठी, बांगड्या वैवाहिक आनंदाचे प्रतीक मानले जातात आणि ज्योतिषशास्त्रात प्रत्येक रंगाचे महत्त्व स्पष्ट आहे. म्हणूनच, बांगड्या घालण्याचे अनेक फायदे आहेत.
काचेच्या बांगड्या घालण्यामागील शास्त्र काय ?
वैज्ञानिकदृष्ट्या, काचेच्या बांगड्या घालण्यामुळे सतत घर्षण होते. या घर्षणामुळे रक्ताभिसरण वाढते. शिवाय, बांगड्या घालण्यामुळे बाहेर पडणारी सकारात्मक ऊर्जा अंगठीच्या आकाराच्या बांगड्यांद्वारे शरीरात पुन्हा शोषली जाते.
बांगड्यांचे घर्षण शरीरातील उपचार केंद्रांना सक्रिय करते, जे आपल्या मनातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करते.
विवाहित महिलांनी किती बांगड्या घालाव्यात ?
विवाहित महिलांनी 21 बांगड्या घालाव्यात तसेच प्रत्येक हातात सोन्याच्या किंवा चांदीच्या 2-2 अशा बांगड्याही घालाव्यात. यामुळे पतीचे आयुष्य वाढते.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेले आहेत. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच आमचा अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)