
हिंदू धर्मामध्ये अमावस्या ही तिथी अत्यंत महत्त्वाची मानले जाते. वर्षातून 12 अमावस्या असतात माघ महिन्यात येणाऱ्या अमावस्येला मौनी अमावस्या म्हणतात. मौनी अमावस्या आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वात महत्त्वाची मानली जाते. मौनी अमावस्येला स्नान आणि दान केले जाते. असे मानले जाते की या दिवशी स्नान आणि दान केल्याने पुण्य प्राप्त होते.
मौनी अमावस्या ही पूर्वजांसाठीही महत्त्वाची मानली जाते. या दिवशी पितरांना नैवेद्य आणि पिंडदानही केले जाते. या दिवशी पितरांना तर्पण आणि पिंडदान अर्पण केल्याने तीन पिढ्यातील पितरांना मोक्ष प्राप्त होतो. या दिवशी मौन साधनाही केली जाते. मौनी अमावस्येला मौन ध्यान केल्याने शुभ फळ मिळते. त्यामुळे या दिवशी मौनसाधना करण्याला काय महत्त्व आहे ते जाणून घेऊ तसेच त्याचे नियम काय आहे ते पाहू.
यावर्षी माघ महिन्यातील अमावस्या तिथी 28 जानेवारीला संध्याकाळी 7: 35 वाजता सुरू होईल आणि 29 जानेवारीला संध्याकाळी 06: 05 मिनिटांनी संपेल. त्यामुळे 29 जानेवारीला मौनी अमावस्या असणार आहे. या दिवशी उपवास आणि पूजाही केली जाते. तसेच या दिवशी महा कुंभामध्ये दुसरे शाही स्नान होणार आहे.
मौनी अमावस्येला ऋषीमुनी मौन पाळतात. मौनी अमावस्येला मौन अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. मौनी अमावस्येला केवळ बोलण्यातच नाही तर मनातही शांतता असते म्हणून हे व्रत केले जाते. मौन साधना केल्याने तणावातून आराम मिळतो, मानसिक शांती मिळते, एकाग्रता वाढते आणि ध्यान करणे सोपे होते. शांतता देवाशी जोडण्यास मदत करते. मौनी अमावस्येला मौन पाळल्याने मोक्ष प्राप्त होतो.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)