
श्रावणाचा महिना हा महादेवांना समर्पित आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण महिन्यात महादेवांची मनोभावे पूजा आणि उपवास केल्यानं पुण्य मिळतं. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होते. महादेवांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत राहातो. श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारला विशेष महत्त्व असतं. महादेवांचे भक्त सोमवारी उपवास करून मनोभावे महादेवांची पूजा करतात. रुद्राभिषेक, लघुरूद्र, महारुद्र, अतिरुद्र अशा विविध प्रकारे तुम्ही श्रावण महिन्यामध्ये महादेवांची पूजा करू शकता.
शिव पुराणात महादेवांचा महिमा आणि श्रावण महिन्याचं वर्णन केलं आहे. शिव पुराणात असं म्हटलं आहे की, महादेव हे असे देवता आहेत, तुम्ही जर भक्तीभावानं त्यांची पूजा केली तर ते लगेच प्रसन्न होतात. त्यांच्या आशीर्वादानं तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. अशा काही गोष्टी आहेत, ज्या महादेवाला अर्पण केल्यास ते आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात, या गोष्टींबाबत देखील शिव पुराणात माहिती देण्यात आली आहे, आज आपण त्याबद्दल माहिती घेणार आहेत.
जल – शिवलिंगावर जल अर्पण केल्यामुळे आपला स्वभाव शांत होतो, आपल्या आचारणात देखील सुधारणा होते.
दूध – शिवलिंगावर दूध अर्पण केल्यास तुम्हाला उत्तम आरोग्याचं वरदान लाभतं
दही – महादेवांना दही अर्पण केल्यामुळे तुमचे विचार प्रगल्भ होतात, तुमच्या स्वाभावामध्ये एक प्रकारची गंभीरता येते.
साखर – महादेवांना साखर अर्पण केल्यामुळे तुमच्या आयुष्यात सुख आणि समुद्धी येते
मध – महादेवांना मध अर्पण केल्यास घराची भरभराट होते
साजूक तूप – महादेवांना तूप आर्पण केल्यास तुमचं आरोग्य चांगलं राहांत, तुमच्या शक्तिमध्ये वाढ होते.
आत्तर – महादेवांना श्रावण महिन्यात आत्तर अर्पण केल्यास तुमचे विचार प्रगल्भ होतात.
चंदन – महादेवांना चंदन अर्पण केल्यास तुमच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होते.
भांग – महादेवांना भांग अर्पण केल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व दु:खाचा नाश होतो.
केशर – महादेवांना केशर अर्पण केल्यास तुमच्या विचारांमध्ये सौम्यता येते.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)