World Vaccination Week | महिलांनी कधीच चुकुवू नये ‘या’ लसींचा डोस

अपोलो हॉस्पिटल, दिल्ली येथील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. अंजना शर्मा यांच्या मते, गर्भधारणेदरम्यान आपण महिलांना लसीकरणाद्वारे आणि 6 महिन्यांपर्यंतच्या अर्भकांना वाचवू शकतो. MMR, Tdap आणि HPV सारख्या लस महिलांसाठी, विशेषतः गरोदरपणात खूप महत्त्वाच्या आहेत.

World Vaccination Week | महिलांनी कधीच चुकुवू नये 'या' लसींचा डोस
Follow us
| Updated on: Jul 04, 2022 | 8:28 PM

नवी दिल्ली: जागतिक ‘लसीकरण सप्ताह’ (Vaccination Week) दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात (एप्रिल 24-30) सर्व वयोगटातील लोकांना विविध प्रकारच्या रोगांपासून संरक्षण (Protection from diseases) करण्यासाठी लसींच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी पाळला जातो. यंदाच्या जागतिक लसीकरण सप्ताहाची थीम ‘सर्वांसाठी दीर्घायुष्य’ अशी आहे. या वर्षीची थीम ‘दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी लसीकरणाचे महत्त्व’ तसेच लस ‘समानतेचे समर्थन’ करते. सर्वांनी लस घेण्याचा विषय येतो तेव्हा, स्त्रिया अनेकदा मागे राहतात. लसीकरणाच्या अभावामुळे स्त्रिया, विशेषत: गरोदर स्त्रिया, अनेक आजारांना बळी पडतात, ज्याचा परिणाम नवजात बालकांच्या आरोग्यावरही (Also on the health of newborns) होतो. अपोलो क्रॅडल अँड चिल्ड्रन्स हॉस्पिटल, बेंगळुरू येथील ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गरिमा जैन यांच्या मते, गर्भधारणेदरम्यान स्त्रीची शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि त्यामुळे लसीकरणाची प्रक्रीया अपरिहार्य असते. महिलांनी न चुकता या लसी घेणे गरजेचे असते. “गर्भधारणेदरम्यान, टिटॅनसचे दोन शॉट्स आवश्यक आहेत. भारतात, धनुर्वात लसीकरणाचा नियम चांगल्या प्रकारे पाळला असल्याने, भारतील गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांमध्ये, आता धनुर्वात हा आजार दिसून येत नाही.

गरोदरपणात महत्वाचे लसीकरण

अपोलो हॉस्पिटल, दिल्ली येथील प्रसूती आणि स्त्रीरोगतज्ञ डॉ. अंजना शर्मा यांच्या मते, गर्भधारणेदरम्यान आपण महिलांना लसीकरणाद्वारे आणि 6 महिन्यांपर्यंतच्या अर्भकांना वाचवू शकतो. MMR, Tdap आणि HPV सारख्या लस महिलांसाठी, विशेषतः गरोदरपणात खूप महत्त्वाच्या आहेत. “तरुण मुलींना रुबेला होण्याची शक्यता आहे की नाही हे पाहण्यासाठी MMR लस वापरली जाते. MMR म्हणजे गालगुंड, गोवर आणि रुबेला. जर तरुणपणात रुबेलाची लस घेतली नाही तर, अशा मुलींना गर्भधारणेदरम्यान अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तसेच चिकन पॉक्स आणि हिपॅटायटीस बी या लसीही खूप महत्वाच्या आहेत.

गर्भधारणेदरम्यान आवश्यक लस

डॉ. अंजना यांनी सांगीतले की, गर्भधारणेच्या 24-28 आठवड्यांच्या दरम्यान, इन्फ्लूएंझा लसींची शिफारस वैद्यकीय तज्ज्ञ करतात. टिटॅनस, डिप्थीरिया आणि पेर्टुसिससाठी टीडीएपी लस गर्भवती महिलांसाठी देखील महत्त्वाची आहे. ज्या महिलांनी यापूर्वी कधीही धनुर्वाताची लस घेतली नाही त्या टिटॅनसची लस आणि टीडीएपी बूस्टरचा पहिला डोस घेऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

कर्करोगापासून बचावासाठी लस

पुढे डॉ. अंजना सांगतात की, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची बहुतेक प्रकरणे मानवी पॅपिलोमा विषाणू (HPV) शी संबंधित आहेत आणि स्त्रियांमध्ये हा चौथा सामान्य कर्करोग आहे. तरुण मुलींनी, विशेषत: 9-15 वर्षे वयोगटातील, लस घ्यावी कारण, या वयात शरीर मजबूत प्रतिपिंड विकसित होतात. “सर्विकल कॅन्सर हा विषाणूमुळे होतो आणि तो लैंगिक संपर्कात आल्यानंतर होतो. म्हणून, 9-15 वयोगटातील मुलींनी लस घेणे योग्य आहे. जर, या वयोगटात लस घेता आली नाही, तर तुम्ही, 26 वर्षांच्या वयापर्यंत लसीकरणाचे तीन डोस घेऊ शकता. ती मुदत चुकवल्यास, स्त्रिया 46 वर्षांच्या वयापर्यंत लस घेऊ शकतात. एचपीव्ही गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची नॅनोव्हाक्सिन ही सर्वात प्रभावी उपाय आहे.

Disclaimer: A public awareness initiative by GlaxoSmithKline Pharmaceuticals Limited. Information in this material does not constitute any medical advice. Please consult your physician for any medical advice. Views and opinions in quotes are of independent Health Care professionals & not of GSK.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.