Pimpri-Chinchwad : पबजी हत्याकांडानंतर पिंपरी हत्याकांड! आईसोबत विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्याचा मुलाने चिरला गळा, भोसरीत खळबळ

Pimpri-Chinchwad Crime News : हत्या करण्यात आलेल्या दीपक वाघमारे आणि मारेकरी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या आईचे अनैतिक संबंध होते.

Pimpri-Chinchwad : पबजी हत्याकांडानंतर पिंपरी हत्याकांड! आईसोबत विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्याचा मुलाने चिरला गळा, भोसरीत खळबळ
धक्कादायक घटनाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 9:30 AM

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad Murder News) अल्पवयीन मुलानं एकाची गळा चिरुन हत्या केली. या हत्येमागचं कारणही हादरवून टाकणारं आहे. आपल्या आईसोबत विवाहबाह्य संबंध ठेवल्याचा राग मुलाला होता. त्यातूनच या मुलानं हत्येचा कट रचला. गेल्या पाच वर्षांपासून आईशी (Pimpri-Chinchwad News) विवाहबाद्य संबंध मुलाला खटकत होते. अखेर मुलाने या व्यक्तीचा काटा काढला. या इसमाला एका निर्जनस्थळी नेऊन अल्पवयीन मुलाने त्याचा खून केला. पिंपरी चिंचवडच्या (Pimpri-Chinchwad Crime News) भोसरी परिसरात ही धक्कादायक घटना उघडकीस आलीय. या घटनेनं सगळेच हादरुन गेलेत. हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव दीपक वाघमारे असं आहे. या हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून अधिक तपास केला जातोय.

पबजीनंतर पिंपरी हत्याकांड

गेल्या काही दिवसांपासून पबजी हत्याकाडांची चर्चा सुरु आहे. आई आणि प्रॉपर्टी डिलर अंकलच्या भेटीचा राग, आईची मारहाण, आई आणि वडिलांचं भांडणं, या सगळ्याच्या रागातून एक मुलानं आपल्या आईचीच हत्या केली असल्याचं उघड झालं होतं. सुरुवातील पबजी खेळू न दिल्यानं आईची मुलानं गोळ्या घालून हत्या केल्याचं सांगितलं जातं होतं. मात्र नंतर करण्यात आलेल्या पोलीस तपासातून धक्कादायक खुलासे होते गेले होते. बापाच्या उकसवण्यावरुन आणि आईच्या विरोधात मनात तयार झालेल्या द्वेषातूनच मुलानं आईची गोळ्या घालून हत्या केल्याचं नंतर समोर आलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता पिंपरीतील हत्याकांडानं सगळेच हादरुन गेलेत.

आईन अनैतिक संबंध ठेवल्याचा राग

हत्या करण्यात आलेल्या दीपक वाघमारे आणि मारेकरी असलेल्या अल्पवयीन मुलाच्या आईचे अनैतिक संबंध होते. मयत दीपक हा वडील आणि अल्पवयीन मुलगा घराबाहेर गेले, की आईला भेटायचा. ही बाब अल्पवयीन मुलाला खटकली होती. याचा राग मुलाच्या मनात खदखदत होता. त्यातूनच या मुलाननं दीपकची हत्या करण्याचा कट रचला.

हे सुद्धा वाचा

गळाच चिरला

एका व्यक्तीकडे पैसे आणण्यासाठीचा बहाणा करत दीपकला अल्पवयीन मुलानं बोलावून घेतलं. त्यानंतर दीपकला हा मुलगा एका निर्जनस्थळी घेऊन गेला. तिथं त्यानं दीपकचा गळा चिरला आणि त्याचा खून केला. यानंतर मुलगा पसार झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दीपका मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. दरम्यान, अल्पवयीन मुलागा हत्येवेळी नशेत होता, अशीही माहिती समोर आली आहे. हा मुलगा एका किराणामालाच्या दुकानात डिलिव्हरी बॉयचं काम करत होता.

Non Stop LIVE Update
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती
ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंच्या पत्नीनं जोडले हात अन् केली विनंती.
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला...
दिल्ली भाजपच्या कोअर कमिटीत निर्णय, हायकमांडच्या महाराष्ट्र भाजपला....
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप
हे सर्व सरकार घडवतंय...मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर जरांगेंचा आरोप.
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा
मन लागो रे लागो गुरू भजनी... संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचे बघा.
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?
हुजरेगिरी करून नेता झाला, लायकी काय? संजय राऊतांवर कुणाची जहरी टीका?.
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले
'...तर भुजबळ नक्की मुख्यमंत्री झाले असते', संजय राऊत नेमकं काय म्हणाले.
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस
मुंबईसह उपनगरात रात्रीपासूनच पावसाची बॅटिंग; 'या' भागात मुसळधार पाऊस.
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला
पाणीपुरी खाण्याचे शौकीन आहात? मग हा व्हिडीओ नक्की बघा, नाहीतर तुम्हाला.
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग
तुमची एकजूट असेल तर खात्री देतो...शरद पवारांनी फुंकलं विधानसभेच रणशिंग.
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा
बापाची जहागिरदारी नसून नोकऱ्या नीट करा, नाहीतर... पडळकरांचा थेट इशारा.