Pune crime : मानलेल्या बहिणीसह तिच्या बॉयफ्रेंडला त्रास दिल्याचा जाब विचारला म्हणून काटा काढला; विश्रांतवाडीतल्या दोघांच्या खुनाचा लागला छडा

सुशांत गडदेचा यात काही संबंध नव्हता. मात्र विकीला पाण्यात ढकलून दिल्याचे त्याने पाहिले. म्हणून दगड घेऊन तो त्यांना मारायला गेला, मात्र त्यांनी सुशांतलाही ढकलून दिले. दरम्यान, मोहित लंकेच्या तक्रारीवरून दोघांपैकी एक आरोपी प्रसन्नला अटक करण्यात आली आहे.

Pune crime : मानलेल्या बहिणीसह तिच्या बॉयफ्रेंडला त्रास दिल्याचा जाब विचारला म्हणून काटा काढला; विश्रांतवाडीतल्या दोघांच्या खुनाचा लागला छडा
दुहेरी खूनप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांना केली एकाला अटकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 10:00 AM

पुणे : विश्रांतवाडीत (Vishrantwadi) गेल्या आठवड्यात झालेल्या दोघांच्या खुनाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. पूर्ववैमनस्यातून आणि मानलेल्या बहिणीला त्रास दिल्याचा जाब विचारल्याच्या कारणातून हे खून (Murder) झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. हा प्रकार होण्यापूर्वी झालेल्या वादावादीतून दोघांना दारू पाजून खाणीमध्ये ढकलून देऊन त्यांचा खून केल्याचे तपासात उघड झाले आहे. मागील आठवड्यात हा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी प्रसन्न थूल उर्फ गोट्या (वय 21, रा. पंचशील नगर) याला अटक (Arrested) केली आहे. तर अनिकेत उरणकर उर्फ हुर्‍या (वय 24, रा. औंध रोड) याच्याविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहित नानाभाऊ लंके (वय18, रा. अनिरुद्ध अपार्टमेंट, भीमनगरच्या पाठीमागे, विश्रांतवाडी) याने फिर्याद दिली आहे.

खुनाचा गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जून रोजी विश्रांतवाडीतील भीमनगर परिसरात राहणारे विकी नानाभाऊ लंके (20) आणि सुशांत गडदे (20) हे दोघेजण बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या नातेवाईकांनी दिली होती. दरम्यान शनिवारी (दि.11) दुपारी विश्रांतवाडीतील पाण्याच्या खाणीमध्ये त्यांचे मृतदेह आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी सुरवातीला मृत्यूची नोंद केली. मात्र, पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करीत लंके आणि गडदे बेपत्ता झालेल्या दिवशी कोणासोबत होते, याचा शोध घेतल्यानंतर त्यांचा खून झाल्याचे तपासात उघड झाले. त्यानुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

रात्रीपासून पहाटेपर्यंत पाजली दारू

दोनही मृतदेह 11 जूनला खदानीतून मिळून आले. मृतदेहावर संशय वाटावा, असे काही दिसत नव्हते. जखमा नव्हत्या. मृतदेह फुगलेल्या अवस्थेत होते. गुन्हे प्रकटीकरणाच्या अधिकाऱ्यांसह आमच्या पथकाने तपास केला. तपासानंतर स्पष्ट झाले, की हे इसम सहा तारखेच्या रात्रीपासून सात तारखेच्या पहाटेपर्यंत दारू पित बसले होते. त्यांच्याबरोबर आणखी कुणी होते, का याचा तपास केल्यानंतर अनिकेत उरणकर आणि प्रसन्न थूल हे त्यांच्याबरोर होते. मग या दोघांच्या समोर ही घटना घडली असताना त्यांनी कोणालाही न सांगता परिसरातून फरार झाले.

हे सुद्धा वाचा

खोटी माहिती देऊन दिशाभूल

या सर्वांचे एकमेकांशी वाद झाल्याचे तपासात पुढे आले. अनिकेतचा मित्र आकाश वाघमारे हा विकी लंकेची मानलेली बहीण आणि तिचा बॉयफ्रेंड यांना त्रास देत होता. त्या कारणावरून विकी लंकेने अनिकेत उरणकरमार्फत आकाश वाघमारेला समज दिली. ते अनिकेला आवडलेले नव्हते. या कारणावरून त्यांचे वाद झाले होते. दरम्यान, प्रसन्न थूलकडून बरीचशी खोटी माहिती देण्याचा प्रयत्न झाला. मात्र विश्वासात घेऊन त्याच्याकडून माहिती मिळवली. या दोघाही आरोपींनी विकीला दारू पाजून खदानीजवळ नेले आणि त्याचा खून केला.

संबंध नसताना सुशांत गडदेचा बळी

सुशांत गडदेचा यात काही संबंध नव्हता. मात्र विकीला पाण्यात ढकलून दिल्याचे त्याने पाहिले. म्हणून दगड घेऊन तो त्यांना मारायला गेला, मात्र त्यांनी सुशांतलाही ढकलून दिले. दरम्यान, मोहित लंकेच्या तक्रारीवरून दोघांपैकी एक आरोपी प्रसन्नला अटक करण्यात आली आहे. तर अनिकेत उरणकरचा शोध घेण्यासाठी चार पथके तयार करण्यात आल्याचे विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय भापकर यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.