Cricket: 16 वर्षीय भारतीय क्रिकेटपटूने केला धावांचा अनोखा रेकॉर्ड, 48 चौकारसह 24 षटकारांची केली आतषबाजी

| Updated on: Nov 14, 2022 | 1:29 PM

मीडियाने जाहीर केलेल्या माहितीनुसार शिमोगा येथील राहणाऱ्या तन्मयने कर्नाटक स्टेट क्रिकेट एसोसिएशनकडून खेळलेल्या मॅचमध्ये हा कारनामा केला आहे.

Cricket: 16 वर्षीय भारतीय क्रिकेटपटूने केला धावांचा अनोखा रेकॉर्ड, 48 चौकारसह 24 षटकारांची केली आतषबाजी
tanmay-manjunath
Image Credit source: twitter
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा महान फलंदाज सचिन तेंडूलकर (Sachin Tendulkar) याने वयाच्या 16 व्या वर्षी चांगली कामगिरी केली होती. त्याची आजही चर्चा होते. तेंडूलकरने त्यावेळी मी इतक्यात थांबणार नाही, मला अधिककाळ खेळायचं आहे. हे फलंदाजीतून दाखवून दिलं होतं. विशेष म्हणजे तेंडूलकरने दोन दशक क्रिकेट (Cricket) खेळलं आहे. तेंडूलकर सारखाच कारनामा एका युवा खेळाडूने केला आहे. इंटर डिस्ट्रिक्ट क्रिकेट टूर्नामेंटमध्ये तन्मय मंजूनाथ (Tanmay Manjunath) या खेळाडूने एक मोठा रेकॉर्ड केला आहे. 50 ओवरच्या मॅचमध्ये त्याने एकट्याने 407 धावा काढल्या आहेत. त्यामुळे त्याचं अनेकांनी कौतुक केलं आहे.

मीडियाने जाहीर केलेल्या माहितीनुसार शिमोगा येथील राहणाऱ्या तन्मयने कर्नाटक स्टेट क्रिकेट एसोसिएशनकडून खेळलेल्या मॅचमध्ये हा कारनामा केला आहे. सागर क्रिकेट क्लब आणि भद्रावती एनटीटीसी क्लब यांच्यात मॅच होती. तन्मय सागर क्रिकेट क्लबकडून खेळत होता. त्याने 50 ओवरच्या मॅचमध्ये त्याने एकट्याने 407 धावा काढल्या. त्यामध्ये 48 चौकारसह 24 षटकारांची आतषबाजी केली. ज्या प्रेक्षकांनी त्याची खेळी पाहिली त्यांच्यासाठी ती अविस्मरणीय होती.

तन्मयने 407 वैयक्तीक धावा काढल्या, त्यामध्ये 336 धावा फक्त षटकार आणि चौकार मारून काढल्या आहेत. तन्मयच्या चांगल्या खेळीमुळे टीम सागर क्लबची धावसंख्या 583 झाली होती.

हे सुद्धा वाचा

वनडेमध्ये अधिक धावा काढण्याचा रेकॉर्ड टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने श्रीलंकेच्या विरुद्ध 264 धावा काढल्या आहेत. त्यामध्ये त्याने 33 चौकार आणि 9 षटकारांची आतषबाजी केली.