IND vs BAN: पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा फेरबदल, या खेळाडूंना मिळणार संधी

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियात अनपेक्षित बदल, नव्या खेळाडूंना संधी दिल्यामुळे सोशल मीडियार जोरदार चर्चा

IND vs BAN: पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियात मोठा फेरबदल, या खेळाडूंना मिळणार संधी
ind vs ban
Image Credit source: BCCI
| Updated on: Dec 12, 2022 | 7:59 AM

मुंबई : टीम इंडियामध्ये (IND) एक मोठा बदल झाला असल्याचे चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. कसोटी सामन्यात (Test Match) टीम इंडियामध्ये अनेक युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) बोटाला झालेल्या दुखापतीमुळे कसोटी मालिका खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे टीम इंडियाची जबाबदारी केएल राहूल याच्याकडे देण्यात आली आहे. मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा हे दोन खेळाडू सुद्धा कसोटी मालिकेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे यांच्या जागेवर कुणाला संधी मिळणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

टीम इंडियामध्ये कोणत्या खेळाडूला संधी द्यायची याची सगळी जबाबदारी टीम इंडियाचा कसोटी कर्णधार केएल राहूल आणि प्रशिक्षक राहूल द्रविड यांच्याकडे देण्यात आली आहे. शमी आणि जाडेजा यांच्या जागेवर नवदीप सैनी आणि सौरभ कुमार यांना संधी देण्यात आली आहे.

रोहित शर्माच्या जागी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे. तो केएल राहूलसोबत पहिल्या कसोटीत ओपनिंग करेल, शुभमन गिल धडाकेबाज फलंदाज असल्यामुळे त्याला संधी देण्यात आली आहे.

सध्याच्या कसोटी मालिकेत कोणता खेळाडू कशी कामगिरी करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. बीसीसीआय चांगल्या खेळाडूंना पुढच्यावर्षी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत त्या खेळाडूंना संधी देणार आहे.

पहिल्या कसोटीसाठी टीम इंडियामध्ये या खेळाडूंना संधी

केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि नवदीप सैनी.