टीम इंडियाचा सर्वांत जास्त शिकलेला क्रिकेटर, ज्याला भारताचा ग्रेन मॅक्ग्रा म्हटलं गेलं, पण पुढे…

| Updated on: May 21, 2021 | 10:01 AM

आजी माजी भारतीय क्रिकेटपटूंचं शिक्षण किती झालंय, हे अनेकांना जाणून घेण्याची इच्छा असते. किंबहुना आतापर्यंतच्या क्रिकेटर्सपैकी सगळ्यात जास्त शिकलेला क्रिकेटर कोण? असा प्रश्नही अनेकांना पडला असेल. तर त्याचं उत्तर आहे मुंबईकर आविष्कार साळवी! (aavishkar Salvi Most Educated Indian Cricketer)

टीम इंडियाचा सर्वांत जास्त शिकलेला क्रिकेटर, ज्याला भारताचा ग्रेन मॅक्ग्रा म्हटलं गेलं, पण पुढे...
भारताचा माजी वेगवान गोलंदाज अविष्कार साळवी याचा जन्म 20 ऑक्टोबर 1981 रोजी मुंबईमध्ये झाला. अविष्कार साळवीने क्रिकेटबरोबरच शिक्षणालाही तेवढंच महत्त्व दिलं. आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार काळ टिकली नसली तरी त्याने आपले शिक्षण मोठ्या खुबीने पूर्ण केली मोठे केले. त्याने अ‍ॅस्ट्रोफिजिक्समध्ये पीएचडी पूर्ण केली. तो भारतातील आतापर्यंतचा सर्वात शिकलेला क्रिकेटपटू मानला जातो.
Follow us on