IND vs NZ: 12 बॉलमध्ये 50 धावा करशील का तू कधी? युवराजच्या प्रश्नावर अभिषेकचा पलटवार, म्हणाला, तुमच्या वेळेला…
Abhishek Sharma To Yuvraj Singh Post: युवराज सिंगने शतकी खेळीनंतरही अभिषेक शर्माला पोस्ट करुन डिवचले. यानंतर अभिषेकनेही स्पष्ट शब्दात उत्तर दिले.

IND vs NZ 3rd T20 Match : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तिसरा टी-२० सामना रंगला. या सामन्यात भारतीय संघाचा विजय़ झाला. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी किवी संघाच्या गोलंदाजांना धु धु धुतले. अभिषेक शर्माने तर काल न्यूझीलंडच्या भूमीवर तुफान आणले. अभिषेकला रोखणं किवी गोलंदाजांना असह्य झाले. अभिषेकच्या या झंझावती खेळीचे सर्वांनी तोंडभरुन कौतुक केले पण गुरु युवराज सिंगने त्याचे कान टोचले. यावरही अभिषेकने जे उत्तर दिले त्याची आता चर्चा सुरु आहे.
युवराजने २००७ च्या टी-२० विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध १२ चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते. इतर कोणत्याही खेळाडूला इतक्या कमी चेंडूंमध्ये अर्धशतक करता आलेले नाही. वेलिंग्टन येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अभिषेकने ३८ चेंडूंमध्ये ११३ धावा केल्या. त्याने आपल्या या धडाकेबाज खेळीत नऊ चौकार आणि ११ षटकार मारले. त्याने १५ चेंडूंमध्ये अर्धशतक आणि ३५ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले. त्याच्या टी-२० कारकिर्दीतील हे चौथे शतक आहे.
२६ वर्षीय अभिषेकने, वैभव सूर्यवंशी (१९ चेंडूंत ४५ धावा) सोबत मिळून भारताला एक भक्कम सुरुवात करून दिली. या दोघांनी सलामीला ११८ धावांची भागीदारी केली. भारताने तिसऱ्या टी२० सामन्यात १९९ धावांचे लक्ष्य १३.२ षटकांत पूर्ण केले आणि पाच सामन्यांच्या मालिकेत अभेद्य आघाडी घेतली. अभिषेकच्या अर्धशतकानंतर, युवराज सिंगने ‘एक पोस्ट शेअर केली ज्याने सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे. यपवराज सिंग म्हणाला की “तू अजूनही १२ चेंडूंत ५० धावा करू शकला नाही? जणू काही दोन डावखुरे फलंदाज आपापल्या घरच्या मैदानावर फलंदाजी करत आहेत. मी ३० किंवा ३४ चेंडूंमध्ये १०० धावा करू शकत नाही. शाब्बास, सर अभिषेक. एक शानदार खेळी, आणि तुम्ही एक धावही घेतली. दुसरीकडे, वैभव सूर्यवंशीने उत्कृष्ट कामगिरी केली. एक उत्तम जोडी! संघभावनेने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या संजू सॅमसनला सलाम. आमच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली आणि धावसंख्या २०० च्या खाली ठेवली. एक शानदार मालिका विजय. टीम इंडियाचे अभिनंदन.”
अभिषेकला त्याच्या शानदार फलंदाजीसाठी वेलिंग्टनमध्ये ‘सामनावीर’ पुरस्कार मिळाला. पुरस्कार जिंकल्यानंतर, युवराजच्या १२ चेंडूंच्या संदेशाबद्दल विचारले असता, अभिषेक म्हणाला, “मी याबद्दल आधीही बोललो आहे. त्यावेळी ते कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळले याबद्दल मला माहित नाही. जर एखाद्या फलंदाजाला तशी फलंदाजी करायची असेल, तर ते अजिबात सोपे नसते. तुम्ही सहज मैदानात जाऊन १२ चेंडूंमध्ये ५० धावा करू शकत नाही. कधीकधी असे घडते. फलंदाज म्हणून आम्ही त्या माईल स्टोनचा विचार करत नाही. संघाने जिंकावे अशी आमची नेहमीच इच्छा असते. आजही तीच योजना होती.”
अभिषेक त्याच्या खेळीबद्दल म्हणाला, “वैभव आणि मी आमच्या खेळाचा आनंद घेत होतो, विशेषतः पॉवरप्लेमध्ये. क्षेत्ररक्षण करताना आमच्या लक्षात आले की खेळपट्टीवर जास्त उसळी होती आणि मैदानावर एक लहान जागा होती, जिचा आम्ही पॉवरप्लेमध्ये उपयोग करू शकलो. संघासाठी गती निर्माण करणे आणि नंतर पुढे जात राहणे, हीच आमची योजना होती.”