IND vs ZIM: 3 मॅचमध्ये फक्त 11 धावा, झिम्बाब्वेविरुद्ध खराब कामगिरीमुळे खचून गेला अभिषेक शर्मा; पण सूर्या दादाने जे केलं त्याचं सर्वत्र कौतुक

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील टी-20 मालिका पार पडली. या मालिकेत अभिषेक शर्माला विशेष कामगिरी करता आलेली नाही. आता यानंतर अभिषेकने एक पोस्ट शेअर केली ज्याची आता जोरदार चर्चा सुरु आहे.

IND vs ZIM: 3 मॅचमध्ये फक्त 11 धावा, झिम्बाब्वेविरुद्ध खराब कामगिरीमुळे खचून गेला अभिषेक शर्मा; पण सूर्या दादाने जे केलं त्याचं सर्वत्र कौतुक
| Updated on: Jul 27, 2026 | 2:53 PM

भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी-20 सामन्यांची मालिका पार पडली जी भारतीय संघाने जिंकली. भारतीय संघाने जोरदार कमबॅक केला आहे. भारतीय संघाने या मालिकेतील तिन्ही सामने जिंकले. यापूर्वीच्या दोन मालिका गमावल्यानंचर प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या मालिकेत वैभव सूर्यवंशीवर विशेष लक्ष होते. तर त्याने या मालिकेत तशी कामगिरीही केली. आता या मालिकेत अभिषेक शर्माला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. अभिषेक शर्मालाही त्याची कामगिरी आवडलेली नाही. यामुळे आता अभिषेक शर्माने या संदर्भात एक पोस्टही शेअर केली आहे. जी आता प्रचंड व्हायरल होत आहे. पण पोस्ट चर्चेत येण्यामागचे कारण म्हणजे या पोस्टवर सूर्यकुमार यादवने केलेली कमेंट.

अभिषेक शर्मा हा केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात धोकादायक सलामीवीरांपैकी एक आहे. तो त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण झिम्बाब्वेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत तो पूर्णपणे अपयशी ठरला. अभिषेक तीन सामन्यांमध्ये केवळ 11 धावाच करू शकला. अभिषेक आपल्या कामगिरीवर स्पष्टपणे नाराज होता आणि मालिका संपल्यानंतर त्याने सोशल मीडियावर आपली खंत व्यक्त केली.  झिम्बाब्वे दौरा संपल्यानंतर अभिषेक शर्माने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. तो आपल्या कामगिरीवर नाराज दिसत होता, पण कठोर परिश्रमातून जोरदार पुनरागमन करण्याचा विश्वास त्याने व्यक्त केला. तो म्हणाला, “जेव्हा लोकांच्या तुमच्याकडून अपेक्षा असतात आणि तुम्ही त्या पूर्ण करू शकत नाही, तेव्हा वाईट वाटते. हा खेळ नेहमीच कठोर परिश्रम करणाऱ्यांना फळ देतो. संघ जिंकला याचा मला आनंद आहे. मी जोरदार पुनरागमन करेन.”

भारतीय संघाचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माच्या पोस्टवर कमेंट करत, त्याला प्रोत्साहन दिले आणि गेल्या दोन वर्षांत भारतासाठी दिलेल्या त्याच्या योगदानाची आठवण काढली. सूर्यकुमार म्हणाले, “गेल्या दोन वर्षांपासून तू आम्हाला सातत्याने हसण्याची कारणे दिली आहेस. जेव्हा सर्वात जास्त गरज होती, तेव्हा तू भारतासाठी सर्वोत्तम कामगिरी केलीस. आता फक्त वेळेची गोष्ट आहे. स्वतःशी प्रामाणिक राहा.”

अभिषेक शर्मासाठी झिम्बाब्वे दौरा विसरण्यासारखा ठरला, कारण तो तीन सामन्यांमध्ये फक्त 11 धावा करू शकला. मात्र, त्याचा सलामीचा साथीदार वैभव सूर्यवंशीसाठी ही मालिका पूर्णपणे वेगळी ठरली. त्याने दोन अर्धशतकांसह तीन सामन्यांमध्ये 151 धावा केल्या. झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत वैभवची सरासरी 50.33 होती आणि त्याने 196.10 च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी केली. आशा आहे की, अभिषेक आशियाई क्रीडा स्पर्धेत आपला फॉर्म परत मिळवेल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us