Asia Cup 2025 : आता PCB च्या अध्यक्षाची नीच हरकत, लायकी दाखवली, भारताशी घेतला पंगा

Asia Cup 2025 : आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये टीम इंडियाने प्रवेश केला आहे. या दरम्यान आशियाई क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी एक नीच हरकत केली आहे. त्यावरुन त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करुन भारताशी पंगा घेतला आहे.

Asia Cup 2025 : आता PCB च्या अध्यक्षाची नीच हरकत, लायकी दाखवली, भारताशी घेतला पंगा
Mohsin Naqvi Controversy
Image Credit source: PTI
| Updated on: Sep 25, 2025 | 10:13 AM

Mohsin Naqvi Controversy : आशिया कप 2025 टुर्नामेंट दरम्यान टीम इंडियाने सलग पाचवा विजय मिळवला आहे. सुपर-4 च्या महत्वाच्या सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशला 41 धावांनी हरवून फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. भारताच्या या विजयामुळे श्रीलंकेच्या संघ टुर्नामेंट बाहेर गेला आहे. 25 सप्टेंबर रोजी म्हणजे आत पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये होणारा सामना सेमीफायनल सारखा असेल. जो संघ हा सामना जिंकेल, त्याला फायनलच तिकीट मिळेल. या दरम्यान एशियन क्रिकेट काउंसिलचे (ACC) अध्यक्ष मोहसीन नकवी यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करुन भारताशी पंगा घेतला आहे. या नीच हरकतीवर सर्वत्र टीका सुरु आहे.

ACC चे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) चेअरमन मोहसिन नकवी यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केलाय. यात महान फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो एरोप्लेन उडण्याचा इशारा करत आहे. मोहसीन नकवीने हा फोटो पोस्ट करुन थेट भारताशी पंगा घेतला आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर दोन वर्षांची बंदी घालावी

या कृतीबद्दल मोहसीन नकवी यांच्यावर सोशल मीडियावर खूप टीका होत आहे. एका फॅनने लिहिलय, “जर ICC मध्ये थोडी जरी लाज शिल्लक असेल, तर त्यांनी पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर दोन वर्षांची बंदी घालावी. ACC च्या अध्यक्षाने जाणूनबुजून हा फोटो पोस्ट करुन भारताची खिल्ली उडवली आहे, हे योग्य नाही”

पाकिस्तानला हे सत्य पचवण खूप कठिण

नुकताच सुपर-4 च्या सामन्या दरम्यान पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफने फिल्डिंग करताना अशाच प्रकारचा इशारा केला होता. त्यानंतर त्याच्यावरही बरीच टीका झालेली. टीम इंडियाचा खेळाडू अर्शदीप सिंहने हारिस रौफच्या या कृतीला तशाच भाषेत प्रत्युत्तर दिलं होतं. हा सगळा विषय ऑपरेशन सिंदूरशी संबंधित आहे. भारताने 7 मे 10 मे या चार दिवसाच्या लढाईत पाकिस्तानला धु-धु धुतलं होतं. इंडियन एअर फोर्सने पाकिस्तानात तांडव केलं होतं. त्यांचे एअर बेस उडवून दिले होते. पाकिस्तानला पुढची अनेक वर्ष हे सत्य पचवण खूप जड जाणार आहे.


आजची मॅच दोन्ही टीमसाठी करो या मरो

दरम्यान काल टीम इंडियाने सुपर-4 राऊंडमध्ये बांग्लादेशवर 41 धावांनी शानदार विजय मिळवून दिमाखात आशिया कप 2025 च्या फायनलमध्ये प्रवेश केला. 28 सप्टेंबरला टीम इंडियाचा अंतिम सामना बांग्लादेश किंवा पाकिस्तान विरुद्ध होऊ शकतो. आजचा पाकिस्तान-बांग्लादेश सामना दोन्ही टीम्ससाठी करो या मरो आहे. जी टीम जिंकणार, ती फायनलमध्ये पोहोचणार. टुर्नामेंटमध्ये फायनलच्या निमित्ताने तिसऱ्यांदा भारत-पाकिस्तानचा सामना होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.