MI vs CSK : मुंबईकडून हरल्यानंतर आपल्याच माणसांकडून चेन्नईवर प्रश्नचिन्ह, ‘CSK ची इतकी खराब टीम…’

MI vs CSK : IPL 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या प्रदर्शनाचा स्तर घसरला आहे. CSK ची टीम खूप खराब खेळत आहे. चेन्नईची टीम पॉइंट्स टेबलमध्ये तळाला आहे. कालपर्यंत फक्त बाहेरचे लोक बोलत होते, आता आपल्याच माणसांनी टीमवर प्रश्नचिन्ह निर्माण करायला सुरुवात केली आहे.

MI vs CSK : मुंबईकडून हरल्यानंतर आपल्याच माणसांकडून चेन्नईवर प्रश्नचिन्ह, CSK ची इतकी खराब टीम...
CSK
Image Credit source: PTI
| Updated on: Apr 21, 2025 | 11:08 AM

IPL 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्सची स्थिती खराब आहे. आतापर्यंत खेळलेल्या 8 सामन्यापैकी 6 मॅचमध्ये टीमचा पराभव झाला आहे. आयपीएलच्या पॉइंट्स टेबलमध्ये चेन्नईची टीम तळाला आहे. टीमच्या या स्थितीच कारण त्यांची खराब फलंदाजी आहे. चेन्नईच्या या सुमार प्रदर्शनावर आतापर्यंत बाहेरचे लोक निशाणा साधत होते. पण आता आपल्याच माणसांनी प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे. टीमच्या क्षमतेबद्दल शंका घेतली जात आहे. मुंबई इंडियन्सकडून पराभव झाल्यानंतर इथपर्यंत म्हटलं गेलं की, CSK ची इतकी खराब टीम पाहिलेली नाही.

आता प्रश्न हा आहे की, CSK वर निशाणा साधणारे ते आपले कोण आहेत?, जे आता परक्यासारखा व्यवहार करत आहेत. यात एक नाव सुरेश रैनाच आहे, तो CSK कडून खेळताना टीमने नेहमीच प्लेऑफमध्ये क्वालिफाय केलं. दुसऱ्याबाजूला अंबाती रायडू आहे. मुंबईकडून पराभव झाल्यानंतर दोघांनी मिळून चेन्नई सुपर किंग्सवर कडाडून टीका केली. ऑक्शनपासून टीम सिलेक्शनपर्यंत, गोलंदाजी ते फलंदाजीपर्यंत, प्रत्येक निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.

CSK ची इतकी खराब टीम पाहिलेली नाही

स्टार स्पोर्ट्सच्या पोस्ट मॅच शो मध्ये सुरेश रैना इतकही म्हणाला की, त्याने याआधी कधी CSK ची इतकी खराब टीम पाहिलेली नाही. टीम मॅनेजमेंटने ऑक्शनमध्ये चांगले निर्णय घेतले नाहीत, परिणामी त्याची किंमत आता त्यांना चुकवावी लागत आहे.

तो असताना प्रत्येकवेळी ते प्लेऑफमध्ये

सुरेश रैना तोच खेळाडू आहे, जो असताना CSK ची टीम कधी फेल झाली नाही. यामागचा अर्थ असा आहे की, रैना टीममध्ये असताना CSK ने नेहमीच प्लेऑफमध्ये प्रवेश केला. रैना CSK कडून 11 सीजन खेळला. प्रत्येकवेळी ते प्लेऑफमध्ये पोहोचले. रैनाशिवाय 5 सीजन खेळले. फक्त एकाच सीजनमध्ये ते प्लेऑफमध्ये पोहोचले.


कुठलाही इंटेट दिसला नाही

सुरेश रैनाप्रमाणे अंबाती रायडू सुद्धा चेन्नई सुपर किंग्सवर भडकला. त्याने CSK च्या फलंदाजीवर टीका केली. स्टार स्पोर्ट्सवर पोस्ट मॅच शो मध्ये रायडू म्हणाला की, “फलंदाजी खूप खराब होती. मीडल ओव्हर्समध्ये कुठलाही इंटेट दिसला नाही. ज्या पद्धतीची फलंदाजी होती, ते पाहून csk खेळतेय असं वाटलं नाही. त्यांची फलंदाजी t20 ची वाटली नाही. पुढच्या सामन्यात त्यांना आपलं लेव्हल उंचावाव लागेल. थोडं इंटेट दाखवावं लागेल”