
टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने काल शानदार विजय मिळवला. पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवून टीम इंडियाने देशवासियांची मनं जिंकली. क्रिकेट विश्वाला नेहमीच भारत-पाकिस्तान सामन्याची उत्सुक्ता असते. यंदा मॅच आधी वाद झाल्याने उलट जास्त उत्सुक्ता होती. पण निकाल तोच राहिला. नेहमीप्रमाणे भारताने पाकिस्तानला हरवलं. अपेक्षेनुसार हा सामना रंगलाच नाही. भारताने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 175 धावा केल्या. पाकिस्तानचा डाव 114 धावांवर आटोपला. भारताने 61 धावांनी सहज विजय मिळवला.
भारताकडून पराभव झाल्यानंतर पाकिस्तानात त्याच्या प्रतिक्रिया उमटतातच. पण सोशल मीडियावर या सामन्यानंतर पाकिस्तानची खिल्ली उडवणारे बरेच मीम्स व्हायरल झाले. खासकरुन बाबर आझमला टार्गेट करण्यात आलं. बाबर आझम पाकिस्तानचा महत्वाचा खेळाडू आहे. अनुभवी आहे. त्याच्याकडून टीमला बऱ्याच अपेक्षा होत्या. पण पाकिस्तानचा संघ संकटात असताना तो स्वस्तात बाद होऊन तंबूत परतला. त्यामुळे खासकरुन बाबर आझमला इंटरनेटवर लक्ष्य करण्यात आलं. संपूर्ण सामन्यात पाकिस्तानच्या खेळात कुठे समन्वयच दिसला नाही. गोलंदाजी असो वा फलंदाजी प्लानिंगचा अभाव स्पष्ट दिसत होता. कुठला बॅकअप प्लानच दिसत नव्हता.
Babar azam to PCB #INDvsPAK pic.twitter.com/4snCNyhXA8
— Anurag Chaturvedi (@anuragchturvedi) February 15, 2026
Ishan Kishan to Pakistani bowlers #INDvsPAK
pic.twitter.com/SvzX6wQOu3— Vivid Insaan 🧛 (@UnboxedDrafts) February 15, 2026
Me watching Pak Batting #INDvsPAK pic.twitter.com/GDHjfktZMG
— SKUL GAMING (@Skul61020) February 15, 2026
#INDvsPAK pakistanis now pic.twitter.com/x1vY3KTaev
— al fuckad (@al_fuckad21683) February 15, 2026
नशिबाने टॉप एज लागून एक सिक्स
वर्ल्ड कपमध्ये एखाद-दुसरा अपवाद वगळता भारतीय टीमने नेहमीच पाकिस्तानला हरवलं आहे. टीम इंडियासमोर पाकिस्तानचा डाव नेहमीच ढेपाळतो. कालच्या सामन्यातही हेच घडलं. पाकिस्तानची घसरण पहिल्या ओव्हरपासून सुरु झाली. हार्दिक पंड्याने साहीबझादा फरहानला शुन्यावर आऊट केलं. बुमराहच्या गोलंदाजीवर सॅम अयूबचा नशिबाने टॉप एज लागून एक सिक्स गेला. त्यानंतर परफेक्ट यॉर्करवर अयबूने तंबूची वाट धरली. या मॅचनंतर पोट धरुन हसवणारे मीम्स व्हायरल झाले आहेत.