AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Pune Railway : दरडीचा दुहेरी फटका, रस्ते वाहतुकीपाठोपाठ मुंबई-पुणे रेल्वे मार्गही बंद; अनेक गाड्या रद्द, जाणून घ्या अपडेट्स एका क्लिकवर

मुसळधार पावसामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग दरड कोसळून ठप्प झाला आहे. यामुळे मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. इंद्रायणी, डेक्कन क्वीनसह १६ गाड्या रद्द करण्यात आल्या असून, काही गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. प्रवाशांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत असून, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या माहितीसाठी सूचना जारी केल्या आहेत.

Mumbai Pune Railway : दरडीचा दुहेरी फटका, रस्ते वाहतुकीपाठोपाठ मुंबई-पुणे रेल्वे मार्गही बंद; अनेक गाड्या रद्द, जाणून घ्या अपडेट्स एका क्लिकवर
मुबई-पुणे मार्गावरील अनेक गाड्या रद्द
| Updated on: Jul 06, 2026 | 9:40 AM
Share

एकीकडे मिसिंग लिंकवर दरड कोसळल्याने रस्ते मार्ग ठप्प झालेला असतानाच मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरही दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईहून पुण्याकडे आणि पुण्याहून मुंबईच्या दिशेने होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. रेल्वे मार्गालाही पावसाचा चांगलाच फटका बसला असून रस्ता वाहतुकीपाठोपाठ रेल्वे मार्गही बंद झाल्याने पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि मुंबईला येणाऱ्या नागिरकांचे मात्र हाल होत आहेत. त्यांच्या मनस्तापात वाढ झाली आहे. अनेक रेल्वे गाड्या या रद्द करण्यात आल्या असून 9 एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग हा बदलण्यात आला आहे. मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या 6 एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. इंद्रायणी, इंटरसिटी, डेक्कन क्वीन, प्रगति एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच सीएसएमटी-धुळे एक्स्प्रेसदेखील यावेळी रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात घाटात दरड कोसळल्यामुळे या संपूर्ण गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई, पुणे तसेच संबंधित स्टेशन्सवर यासंबंधी रेल्वे प्रशासनाकडून अनाऊन्समेंट करून सूचनही दिल्या जात आहेत.

मुंबई-पुणे रेल्वे वाहतूक ठप्प

आज मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच पुण्यातही मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. याचा परिणाम रेल्वे वाहतुकीवरही झाला आहे. मुंबईलवरून पु्ण्यालाल आणि पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एकूण 16 गाड्या आज रद्द करण्यात आलेल्या आहेत. तसेच लांब पल्ल्याच्या काही गाड्याही मुंबईला येणार नसून त्या थेट पुण्यावरून पुढील दिशेकडे वळवण्यात आल्या असून पर्यायी मार्गाने इच्छित स्टेशनवर पोहोचतील. यांसंबंधीच्या सूचना दादरच्या मध्य रेल्वेच्या स्थानकावरती देण्यात येत आहे. प्रवाशांचा खोळंबा होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

रेल्वेकडून सूचना जारी

खंडाळा ते मंकी हिल ते ठाकूरवाडी या रेल्वे ट्रॅकच्या मधील रेल्वे ट्रॅक वर काही ठिकाणी दगड आणि माती वाहून आल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले असून मुंबई पुणे, पुणे मुंबई चालणाऱ्या पाचही गाड्या आज दि 6 जुलै 2026 रोजी रद्द करण्यात आलेल्या आहेत कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी, अशी सूचना सेंट्रल रेल्वे मुंबई विभागाकडून देण्यात आली आहे. यामध्ये इंद्रायणी एक्स्प्रेस, इंटरिसटी एक्स्प्रेस, डेक्कन क्वीन, प्रगती एक्स्प्रेस आणि धुळे एक्स्प्रेस या 5 गाड्यांचा समावेश आहे.

अनेक गाड्यांचे मार्ग वळवले

दरम्यान मुंबईवरून जाणाऱ्या अनेक गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईवरून बेंगलोरला जाणारी उद्यान एक्सप्रेस आज मुंबईवरून रद्द करण्यात आली आहे. ही गाडी पुण्यावरून बेंगलोरपर्यंत धावणार असल्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच पुण्याच्या गाड्या रद्द करण्यात आल्याची घोषणाही करण्यात आली.

मुंबई–पुणे मार्गावरील प्रवाशांना प्रवासापूर्वी गाडीची स्थिती तपासण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. रेल्वे प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून पुढील अपडेट्स लवकरच देण्यात येतील असं समजतं.

दरम्यान वसई रोड आणि विरार स्थानकांदरम्यान झालेल्या पाणी साचल्यामुळे पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा सध्या अंदाजे १५–२० मिनिटे उशिराने धावत आहे.  प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन त्यानुसार करावे व अतिरिक्त प्रवास वेळ गृहीत धरावा असे आवाहन रेल्वे विभागातर्फे करण्यात आले आहे.

Follow Us
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल
भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान
Chirag Paswan : भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान; रेल्वे-मेट्रो बंदीवरून नेमकं काय म्हणाले?
काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही....
Delhi CJP Protester : काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही CJP कार्यकर्ते...
आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?
Rohit Pawar Speech : आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?
दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र...
CJP Delhi Protest : दिल्लीमध्ये 15 हजार पोलीस तैनात; CJP आंदोलनाला परवानगी नाही मात्र अभिजीत दीपके...
जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; प्रत्येक हालचाल...
Delhi CJP Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवरील आंदोलनावर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर; 150 पोलिसांना बॉडी कॅमेरे, प्रत्येक हालचाल होणार...
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे
Delhi CJP Jantar Mantar Andolan : ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील आंदोलनाचा धसका? जंतरमंतर परिसरात जाणारे सर्व रस्ते बंद, इंटरनेट सेवाही...
सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्..
Delhi Jantar- Mantar CJP Andolan : सीजेपी आंदोलनाआधी दिल्लीचं छावणीत रूपांतर; जंतर-मंतरवर BSF, CRPF अन्....
मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
Abhijeet Dipke : मला अटक करा... अभिजीत दीपकेंचं सरकारला खुलं आव्हान, पुढे म्हणाले...
गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले,
Shivsena : गजानन कीर्तिकरांच्या घरवापसीच्या चर्चेने एकनाथ शिंदे संतापले? म्हणाले, आम्हाला गांभीर्याने....