AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra News LIVE : मुंबई -पुणे एसटी बससेवा बंद, राज्य परिवहन महामंडळाचे मोठे आदेश..

| Updated on: Jul 06, 2026 | 10:24 AM
Share

Maharashtra News LIVE : गेल्या 4 - 5 दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. ज्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरलं आहे. तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली आहे. आज देखील हवामान विभागाने अनेक ठिकाणी रेड अर्लट जारी केलाय. राज्यातील महत्वाच्या घडामोडी, पावसाचे अपडेटस, क्रीडा, मनोरंज, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

Maharashtra News LIVE : मुंबई -पुणे एसटी बससेवा बंद, राज्य परिवहन महामंडळाचे मोठे आदेश..

पुणे आणि मुंबई वाहतूक पुर्णतः ठप्प झालीअसून, मिसिंग लिंकवर दरड तर द्रुतगतीवर पाणीचपाणी झालं आहे. रेल्वे मार्गावर ही दरड कोसळली आहे. पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळे हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्याचं पोलीस प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलंय. तर पुणे शहरात पावसाचा जोर दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान पुणे विभागाने वर्तवला आहे. राज्याला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्यानंतर आज शाळांना देखील सुट्टी जाहिर केली. काल रात्रीपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आजही उपनगरातील अनेक भागांना बसला आहे. अंधेरीतील वीरा देसाई रोडवर आज पण पाणी साचले आहे. तर, राज्यातील महत्वाच्या घडामोडी, पावसाचे अपडेटस, क्रीडा, मनोरंज, राजकारण क्षेत्रातील महत्वाच्या बातम्यांचे लेटेस्ट अपडेट्स या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 06 Jul 2026 09:55 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये आज महाराष्ट्र राज्य विद्यार्थी कृती समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचे आंदोलन

    विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांचे विभागीय आयुक्त कार्यालयावर आंदोलन. आंदोलनाला आमदार रोहित पवार, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांची राहणार प्रमुख उपस्थिती. सकाळी 11 वाजेपासून विभागीय आयुक्त कार्यालयावर सुरू होणार आंदोलन. विभागीय आयुक्त कार्यालयासमोर पोलिसांचा तगडा बंदोबस्त.

  • 06 Jul 2026 09:50 AM (IST)

    इंदिरानगरच्या वृंदावन कॉलनीत जून झाड कोसळले

    अग्निशमन विभागाकडून झाड हटवण्याचे काम सुरू.  सुदैवाने कोणतीही हानी नाही. सकाळपासून नाशिकमध्ये संततधार पावसाला सुरुवात. नाशिकमध्ये पावसाला सुरूवात झाली आहे.

  • 06 Jul 2026 09:40 AM (IST)

    राज्य परिवहन महामंडळाचे अधिकाऱ्यांना आदेश दिल्याची माहिती

    पुढील आदेश येईपर्यंत एसटी बस देखील राहणार बंद. रेल्वे पाठोपाठ पुणे मुंबई एसटी सेवा देखील करण्यात आली बंद. मुंबई पुणे एसटी आणि रेल्वे सेवा बंद झाल्याने प्रवाशांचे मोठे होत आहेत हाल

  • 06 Jul 2026 09:30 AM (IST)

    आयएमडीचा नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला यलो अलर्ट

    पुढील ३ तास हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता. काही भागात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांना अलर्ट. नागरिकांनी वीज कडकडत असताना सुरक्षित ठिकाणी थांबण्याचे आवाहन. भारतीय हवामान विभाग, मुंबईकडून सकाळी ७ वाजता ‘नाऊकास्ट’ इशारा जारी

  • 06 Jul 2026 09:20 AM (IST)

    TCS कंपनीतील लैंगिक अत्याचारासह धर्मांतरण प्रकरण

    निदा खान सह दानिश शेख, तौसिफ अत्तार यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. रजा मेमन, शाहरुख कुरेशीला दिलासा नाही; निदा-दानिशच्या जामीनावर आज अंतिम सुनावणी. धर्मांतर आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपींच्या जामीनावर आज निर्णयाची शक्यता. रजा मेमन व शाहरुख कुरेशी यांचे जामीन अर्ज यापूर्वीच न्यायालयाने फेटाळले. निदा खान व दानिश शेख यांच्या जामीन अर्जावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण. आरोपींना जामीन दिल्यास पुराव्यांशी छेडछाड व पीडितांना धमकीचा धोका – सरकारी पक्षाचा दावा

  • 06 Jul 2026 09:05 AM (IST)

    अंबरनाथमध्ये वालधुनी नदी धोक्याच्या उंबरठ्यावर

    ठाणे जिल्ह्यामध्ये तीन दिवसांच्या पावसाने वालधुनी दुथडी भरून वाहू लागली. प्राचीन शिव मंदिर कडे जाणाऱ्या पुलाच्या काठोकाठ नदीच पाणी. अंबरनाथ नगरपालिकेकडून शून्य कारभार. पालिकेचे सुरक्षारक्षकच वालधुनी परिसरात नाहीसे. पावसाचा जोर वाढला तर प्राचीन शिवमंदिर कडे जाणाऱ्या पुलावर पाणी येण्यास भीती वाढत्या पाण्यामुळे शिवमंदिराकडे जाणारा मार्ग धोक्यात

  • 06 Jul 2026 08:55 AM (IST)

    पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी नगरसेवक थेट रस्त्यावर.. नाल्यात अडकलेला कचरा काढत केली नालेसफाई

    कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पावसानंतर अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लोकग्राम परिसरातील नाल्यात झाडांच्या फांद्या अडकल्याने पाण्याचा प्रवाह खोळंबला होता. शिवसेना नगरसेवक व संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी कार्यकर्त्यांसह थेट नाल्यात उतरून सफाई मोहीम राबवली. पालिकेच्या नालेसफाईवर नाराजी व्यक्त करत संबंधित नाल्याचे रुंदीकरण करण्याची मागणीही त्यांनी केली.

  • 06 Jul 2026 08:40 AM (IST)

    पुण्यातील खडकवासला धरणात एक टीएमसी पाण्याची भर

    पुण्यातील खडकवासला धरणात एक टीएमसी पाण्याची भर पडली आहे. सतत पडत असलेल्या जोरदार मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाणी वाढत आहे. गेल्या दोन दिवसाच्या झालेल्या पावसामुळे एक टीएमसी पाणीसाठा वाढला आहे.

  • 06 Jul 2026 08:30 AM (IST)

    लोणावळा घाटात भीषण वाहतूक कोंडी; मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

    गेल्या तीन तासांपासून लोणावळा घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. मुसळधार पावसामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहे. त्यामुळे पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या नागरिकांनी शक्य असल्यास प्रवास टाळावा, असे आवाहन करण्यात येत आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घाटमार्गावर जाणे टाळावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी. असे आवाहन महामार्ग पोलिसांकडून करण्यात आले आहे.

  • 06 Jul 2026 08:25 AM (IST)

    पुणे–नाशिक महामार्ग पाण्याखाली ; चाकणजवळील वाकी येथे वाहतूक पूर्ण ठप्प

    पुणे आणि नाशिकला जोडणारा महत्त्वाचा पुणे–नाशिक महामार्ग वाकी परिसरात पाण्याखाली गेला आहे. रात्रीपासून महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. चाकण औद्योगिक क्षेत्रात कामासाठी जाणाऱ्या शेकडो कामगारांचा खोळंबा झाला आहे. तर महामार्गावर लगत असणारी दुकाने पाण्याखाली गेली असुन नैसर्गिक पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे पावसाचे पाणी थेट महामार्गावर आल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, प्रशासनाच्या नियोजनावरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत

  • 06 Jul 2026 08:20 AM (IST)

    वसई, विरार, नालासोपाऱ्यात आज चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरूच

    वसई, विरार, नालासोपाऱ्यात आज चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू आहे. तुफानी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरू आहे. विरार नालासोपारा ट्रकवर पाणी आल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक सेव्ह विस्कळीत झाली आहे. वसई विरार नालासोपारा परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने पूर्ण शहर जलमय झाले आहे. अनेक ठिकानी झाड उन्मळून पडले आहेत.

  • 06 Jul 2026 08:15 AM (IST)

    वसई सातिवली भोईदा पाड्यातील रस्ते जलमय

    वसईतील सातिवली भोईदा पाडा येथील पूर्ण रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रात्रभर वसईत पाऊस कोसळत आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात वसईतील भोईदा पाड्यात पाणी साचले आहे. रस्त्यावर एक ट्रक पाण्यात बंद पडला आहे आणि या रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे. प्रवासी गुडगाभर पाण्यातून प्रवास करत आहेत.

  • 06 Jul 2026 08:10 AM (IST)

    रावेर मध्ये वृद्ध महिलेला ट्रकने चिरडल्याने जागीच दुर्दैवी मृत्यू

    रावेर शहरातील बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ घडलेल्या भीषण अपघातात ७५ वर्षीय महिलेचा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडून जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  • 06 Jul 2026 08:05 AM (IST)

    गोंदियाच्या सालेकसा – नानव्हा मार्ग पुलावर पाणी आल्याने बंद…

    गोंदिया जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे… सालेकसा तालुक्यात देखील अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली असून यामुळे नदी नाले दुथळी भरून वाहत आहेत.. सालेकसा तालुका मुख्यालय ते नानव्हा मार्ग पुलावर पाणी आल्याने वाहतुकीसाठी बंद झालेला आहे… यामुळे परिसरातील चार ते पाच गावांचा सालेकसा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे… मात्र या पुलावरून नागरिकांचा जीवघाना प्रवास सुरूच असल्याचे दिसून येत आहे..

Published On - Jul 06,2026 8:01 AM

Follow Us
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती
ठाकरेंना अखेर कळलं, या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान
ठाकरेंना अखेर कळलं... या रेड्याने तोंड उघडले तर... बड्या नेत्याचं विधान तुफान चर्चेत
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
पार्थ पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर सुप्रिया सुळेंचे मोठे विधान, म्हणाल्या...
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान,
राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमाबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे वक्तव्य, काय म्हणाल्या?
मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव- पृथ्वीराज चव्हाण
Prithviraj Chavan | 'मविआ म्हणून सत्ता स्थापन करू; हा माझाच प्रस्ताव...चव्हाणांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपकेंचं मोठं विधान
CJP कार्यकर्त्यांना ग्रामस्थांकडून मारहाण; अभिजीत दिपके यांचं सर्वात मोठं विधान
CJP जखमी विद्यार्थ्यासाठी राहुल गांधींचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या...
CJP च्या जखमी विद्यार्थ्यांसाठी राहुल गांधींचा संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या; जोपर्यंत...
राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार...
एकच खळबळ! राहुल गांधींच्या कार्यक्रमात गर्दी करण्यासाठी 25 हजार... व्हायरल ऑडियो क्लिपमध्ये नेमकं काय?