MS Dhoni : टीम इंडियाच्या लाजीरवाण्या पराभवनंतर धोनी निराश, शांततेत खेळली टेनिसची फायनल

| Updated on: Nov 11, 2022 | 11:08 AM

टीम इंडियाच्या पराभवानंतर महेंद्रसिंग धोनी निराश, सेमीफायनचा पूर्ण सामना पाहिल्यानंतर उतरला मैदानावर...

MS Dhoni : टीम इंडियाच्या लाजीरवाण्या पराभवनंतर धोनी निराश, शांततेत खेळली टेनिसची फायनल
MS Dhoni
Follow us on

मुंबई : टीम इंडियाचा (Team India) काल लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर देशभरातील चाहते निराश झाले. त्याचबरोबर चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social Media) चांगली खेळी न करणाऱ्या खेळाडूंना पहिल्यांदा काढून टाका अशी मागणी केली आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू धोनी (MS Dhoni) हा सुद्धा काल नाराज होता अशी माहिती एका वेबसाईटने दिली आहे. महेंद्रसिंग धोनीने टीम इंडियाला दोन विश्वचषक जिंकून दिले आहेत. त्यामुळे धोनीची यशस्वी कर्णधार म्हणून ओळख आहे.

महेंद्रसिंग धोनीने टीम इंडिया आणि इंग्लंडचा सामना पुर्णपणे पाहिला, त्यानंतर महेंद्रसिंग धोनी इतका निराश झाला की, झारखंडमध्ये टेनिसचा अंतिम सामना खेळण्यासाठी जेएससीए स्टेडियममध्ये पोहोचला होता. ज्यावेळी सामना सुरु झाला त्यावेळी धोनी निराश होता. काल रात्री उशिरा लाईट खराब असल्यामुळे टेनिलची मॅच अर्ध्यावर थांबवण्यात आली. उर्वरीत मॅच 14 तारखेला खेळवण्यात येणार आहे.

कालच्या टेनिस मॅचमध्ये महेंद्रसिंग धोनी आणि त्याचा साथीदार सुमित बजाज यांनी पहिला सेट 6-2 जिंकला आहे. पण लाईट खराब असल्यामुळे मॅच थांबवण्यात आली. ज्यावेळी मॅच थांबली, त्यावेळी त्यांच्या विरुद्ध खेळणाऱ्या खेळाडूंनी सुद्धा धोनीची तारिफ केली. धोनी खेळत असताना सुद्धा त्याचं स्पिरिटं चांगलं असतं.

हे सुद्धा वाचा

कालच्या टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पूर आला आहे. अनेक खेळाडूंवर टीका करण्यात आली आहे.  रविवारी विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान टीम आणि इंग्लंड यांच्यात महामुकाबला पाहायला मिळणार आहे.  पाकिस्तान टीमपेक्षा इंग्लंड टीमचे खेळाडू चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.