अजित पवार पुन्हा कबड्डीच्या मैदानात, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी फेरनिवड

| Updated on: May 24, 2020 | 12:49 PM

यापूर्वी शरद पवार यांनी 28 वर्षे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले आहे (Ajit Pawar Maharashtra Kabaddi Association President)

अजित पवार पुन्हा कबड्डीच्या मैदानात, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी फेरनिवड
Follow us on

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाली आहे. अजित पवार यांची बिनविरोध निवड झाल्याची माहिती आहे. (Ajit Pawar Maharashtra Kabaddi Association President)

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी 28 वर्षे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे अध्यक्षपद सांभाळले होते. तर सप्टेंबर 2005 ते 23 मार्च 2013 या काळात कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची धुरा अजित पवारांकडे सोपवण्यात आली होती.

दरम्यान कबड्डी, खोखोप्रमाणेच महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनमधील शरद पवार यांचा क्रीडा क्षेत्रातील नेतृत्वाचा वारसाही अजित पवार यांच्याकडे चालत आला. पण महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनच्या पदाधिकाऱ्याकडे एकाच संघटनेचे पद असणे बंधनकारक असल्याने 2013 मध्ये अजित पवार यांनी राज्य कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा त्याग केला होता.

हेही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार स्वत:च कारचं सारथ्य करतात तेव्हा…

त्यावेळी अजित पवार यांनी खोखोचे अध्यक्षपद मात्र कायम ठेवले होते. 2006 मध्ये अजित पवार यांनी राज्य खोखो असोसिएशनच्या अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तेव्हापासून तीन वेळा म्हणजे बारा वर्षे अध्यक्षपद त्यांच्याकडेच आहे. तर अजित पवार यांच्या विश्वासू संघटकांकडे राज्य कबड्डीची सूत्रे होती. त्यानंतर अनेक वर्षांनी अजित पवार यांच्याकडे पुन्हा महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदाची माळ आली होती.