AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा… विराट कोहलीचा जवळचा मित्र, माजी क्रिकेटपटूचं निधन, अवघ्या 36 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

who is Amanpreet Singh Gill: भारताच्या अंडर -19 टीमसाठी खेळलेला क्रिकेटर अमनप्रीत सिंह गिलचं वयाच्या 36 व्या वर्षी निधन झालं. अमनप्रीता हा विराट कोहलीसोबतही खएळला होता. एवढंच नव्हे तर आयपीएलमध्ये त्याचा पंजाब किंग्स संघातही समावेश होता. त्याच्या निधनाना क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे.

भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा… विराट कोहलीचा जवळचा मित्र, माजी क्रिकेटपटूचं निधन, अवघ्या 36 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप
अमनप्रीत सिंग गिल
| Updated on: May 07, 2026 | 9:59 AM
Share

भारताकडून अंडर-19 स्पर्धा खेळलेला आणि आयपीएलमधील पंजाब किंग्स संघाचा माजी मध्यमगती गोलंदाज अमनप्रीत सिंग गिल याचं बुधवारी चंदीगडमध्ये वयाच्या अवघ्या 36 व्या वर्षी निधन झाले. अमनप्रीत याच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये मात्र त्याच्या मृत्यूच्या बातमीने क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. अमनप्रीत सिंग गिल हा भारताच्या 19 वर्षांखालील संघात विराट कोहलीसोबतही खेळला होता. एवढंत नव्हे तर त्याने आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाकडून खेळताना सहा प्रथम-श्रेणी सामन्यांमध्ये 11 बळी टिपले होते. इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्या हंगामात तो किंग्स इलेव्हन पंजाब संघाचा भाग होता आणि नंतर त्याने पंजाबच्या वरिष्ठ निवड समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिलं होतं.

पंजाब क्रिकेट असोसिएशनने, सोशल मीडिया प्लॉफरॉ X वर, अनप्रीतच्या निधनाची माहिती दिली. ” माजी क्रिकेटपटू आणि वरिष्ठ निवड समिती सदस्य अमनप्रीत सिंग गिल यांच्या दुःखद निधनाबद्दल पंजाब क्रिकेट असोसिएशन तीव्र शोक व्यक्त करतं. आमच्या मनःपूर्वक संवेदना त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि प्रियजनांप्रति आहेत. वाहेगुरु त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांना शक्ती देवो.” अशी पोस्ट त्यांनी केली आहे.

माजी क्रिकेटपटू युवराज सिंगनेही वाहिली श्रद्धांजली

भारताचा, माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनेही अमनप्रीतला श्रद्धांजली वाहिली.”अमनप्रीत सिंग गिलच्या निधनाची बातमी ऐकून खूप दुःख झाले. आमच्या सुरुवातीच्या काळात आम्ही एकत्र ड्रेसिंग रूममध्ये होतो; तो एक शांत आणि मेहनती क्रिकेटपटू होता, ज्याला खेळाबद्दल प्रचंड आवड होती. त्याच्या कुटुंबीयांप्रति माझ्या संवेदना.” अशं युवराजने पोस्टमध्ये लिहीलं होतं.

अमनप्रीत गिल याने 2007 साली भारतासाठी 5 यूथ वनडे आणि एक यूथ टेस्ट मॅच खेळली. त्याने श्रीलंकेच्या थिसारा परेराची विकेटही घेतली होती, मात्र 2008 चा विश्वचषक जिंकणाऱ्या, विराट कोहलीच्या 19 वर्षांखालील संघात त्याला स्थान मिळालं नव्हतं.

पंजाब किंग्सकडून शोक व्यक्त

अमनप्रीत गिल आयपीएलमध्ये पंजाबच्या संघाकडून खेळला होता, त्याच्या निधनानंतर पंजाब किंग्सनेही इन्स्टाग्रामच्या अधिकृत अकाऊंटवरून श्रद्धांजली वाहिली. “पंजाबचे अभिमानाने प्रतिनिधित्व करणारा आणि पंजाब किंग्स परिवाराचा एक भाग असलेला अमनप्रीत सिंग शेरगिल याच्या निधनाने आम्हाला खूप दुःख झालं. त्यांच्या कुटुंबियांप्रती आमच्या मनःपूर्वक संवेदना.” असं पोस्टमध्ये लिहीलं होतं.

Follow Us
मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या...
CM Fadnavis | मुख्यमंत्र्यांचा मध्यरात्री फोन अन् आंदोलन मागे; 3 दिवसांच्या आंदोलनानंतर रात्री उशिरा अंत्यसंस्कार, नेमकं काय घडलं?
लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल
Railway Updates | लोकल लेट, रस्ते जाम! मुसळधार पावसाने मुंबईकरांची सकाळ केली बेहाल
मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण
Mumbai Rains | मॉन्सूनची धडाकेबाज एंट्री! पहिल्याच पावसात मुंबईची दाणादाण, पुढील 3 तास ऑरेंज अलर्टचा इशारा
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
मोठी बातमी! रायगडचे नवे पालकमंत्री कोण? बंद दाराआड चर्चा होताच…
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाल
राणा जगजीतसिंह पाटलांचा मैत्रीचा प्रस्ताव, ओमराजेंचं थेट विधान; म्हणाले मला त्यांचे...
2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन
DCM Eknath Shinde | 2029 मध्ये सर्व खासदारांना... अखेर शिंदेंची संपूर्ण मास्टर प्लॅन सांगितलाच
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात
मुंबईकरांनो पुढील 24 तास महत्त्वाचे! दादरसह मुंबईच्या उपनगरीय भागात पावसाच्या सरीवर सरी; पहा व्हिडीओ...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
कल्याणमध्ये भयंकर घडलं, झाडाच्या फांदीने केला घात, पाऊस येताच...
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा
प्राजक्त तनपुरे, अरुण लखानी, अनिकेत तटकरेंसह 6 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न
मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा
Kiran Pawaskar | मी उद्धव ठाकरेंबद्दल बोललो, बाळासाहेबांबद्दल नाही; पावसकरांचा खुलासा, म्हणाले...