Asia Cup 2022 : गौतम गंभीरकडून श्रीलंका टीमचं कौतुक, म्हणाला…सुपर टीम

भारत पाकिस्तान आणि श्रीलंका टीमकडून महत्त्वाचे सामने हारल्यानंतर भारताच्या माजी खेळाडूंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती.

Asia Cup 2022 : गौतम गंभीरकडून श्रीलंका टीमचं कौतुक, म्हणाला...सुपर टीम
गौतम गंभीरकडून श्रीलंका टीमचं कौतुक
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 12, 2022 | 1:55 PM

आशिया चषकातून (Asia Cup 2022) टीम इंडिया बाहेर पडल्यानंतर चाहते निराश झाल्याचे सोशल मीडियावर (Social Media) पाहायला मिळाले. त्याचबरोबर त्यांनी टीम इंडियात बदल व्हावा अशी सुचना सुद्धा नेटकऱ्यांनी केली होती. काल अंतिम सामना झाला, त्यामध्ये श्रीलंका (Shrilanka) संघाकडून पाकिस्तानचा संघ पराभूत झाला. पाकिस्तान (Pakistan) जिंकेल अशी स्थिती होती. परंतु श्रीलंकेच्या खेळाडूंनी अंतिम पाच षटकात चांगली गोलंदाजी केल्यामुळे त्याचा विजय झाला.

भारत पाकिस्तान आणि श्रीलंका टीमकडून महत्त्वाचे सामने हारल्यानंतर भारताच्या माजी खेळाडूंनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. भारताच्या माजी खेळाडूंनी क्रीडा व्यवस्थानाकडे प्रश्नांची उत्तरे मागितली होती.

काल श्रीलंकेचा संघ विजयी झाल्यानंतर त्यांना जगभरातील चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. तसेच श्रीलंकेच्या खेळाडूंनी मैदानात जोरदार जल्लोष साजरा केला आहे. त्यामुळे त्यांचे फोटो सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाले आहेत.

कालचा सामना झाल्यानंतर भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज गौतम गंभीर यांने सु्द्धा श्रीलंका टीमचा झेंडा हातात घेतला. तो व्हिडीओ गौतम गंभीर याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्याला सुपर टीम असं कॅप्शन दिलं आहे. हीच टीम त्या चषकाची हकदार आहे असं लिहिलं आहे. चाहत्यांना त्याचा व्हिडीओ अधिक आवडला आहे. त्यावर अनेक चाहत्यांनी कमेंट सुद्धा केली आहे.