Asia Cup 2025 : कुठे, कधी, केव्हा.. Asia Cup मध्ये भारताचा पहिला सामना कोणाशी ? जाणून घ्या सर्व काही एका क्लिकवर
Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये सहभागी होण्यासाठी 4 सप्टेंबर रोजी भारतीय संघ रवाना झाला. या स्पर्धेत टीम इंडियाला पूल-ए मध्ये स्थान मिळाले आहे, ज्यामध्ये पाकिस्तान, यूएई आणि ओमानचाही समावेश आहे.

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ 9 सप्टेंबरपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या टी20 आशिया कपमध्ये सहभागी होणार आहे. टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना 4 सप्टेंबरपर्यंत दुबईला पोहोचण्याचे आदेश बीसीसीआयकडून मिळाले होते, त्याप्रमाणे काल टीम तिथे पोहोचली. आजपासून ( 5 सप्टेंबर) संघाचे पहिले सराव सत्र आयसीसी अकादमीमध्ये होणार आहे. भारतीय संघाला आशिया कप 2025 मध्ये पूल ए मध्ये स्थान मिळाले आहे, ज्यामध्ये यूएई, ओमान आणि पाकिस्तान या संघांचाही समावेश आहे. या स्पर्धेत 10 सप्टेंबर रोजी टीम इंडियाचा पहिला सामना यूएई संघाविरुद्ध आहे.
या मैदानावर भारतीय संघाचा यूएईशी सामना
पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाची तयारी लक्षात घेता, सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील टीम इंडियासाठी आगामी आशिया कप खूप महत्त्वाचा असणार आहे. दुबईच्या मैदानावर भारतीय संघ या स्पर्धेत आपला पहिला सामना 10 सप्टेंबर रोजी यूएईविरुद्ध खेळणार आहे. या मैदानावर भारतीय संघाचा विक्रम टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात जवळपास बरोबरीचा आहे. या मैदानावर आतापर्यंत 9 सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी भारताने 5 सामने जिंकले आहेत तर 4 सामन्यांमध्ये संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.
किती वाजता सुरू होणार भारत वि युएईचा पहिला सामना ?
आशिया कप 2025 चे वेळापत्रक जेव्हा जाहीर झाले तेव्हा सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 07:30 वाजता सुरू होणार होते. पण यूएईमधील कडक उन्हाळ्यामुळे, गरमीमुळे आता आयोजन समितीने सामन्यांची सुरुवातीची वेळ अर्धा तास पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामळे, आता भारत आणि यूएई यांच्यातील हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल, आणि टॉस संध्याकाळी 7:30 वाजता होईल.
सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पाहू शकता?
भारतात होणाऱ्या आशिया कप 2025 च्या सामन्यांचे थेट प्रक्षेपण करण्याचा अधिकार सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहे. म्हणूनचभारत विरुद्ध यूएई सामन्याचे टीव्हीवर थेट प्रक्षेपण सोनी टेन 1 आणि सोनी टेन 3 चॅनेलवर केले जाईल. जर सामन्याच्या लाईव्ह स्ट्रीमिंगबद्दल बोलायचं झालं तर, क्रिकेट प्रेमी हे सोनी लिव्ह ॲपवर भारत विरुद्ध यूएई सामना ऑनलाइन पाहू शकतात. याशिवाय, चाहते त्यांच्या स्मार्ट टीव्हीवर सोनी लिव्ह ॲपमध्ये लॉग इन करून सामना पाहू शकतात.
