
India vs Pakistan : आशिया कप 2025 स्पर्धेत काल सुपर-4 मध्ये भारत-पाकिस्तानचा सामना झाला. भारताने जोरदार विजय मिळवत पाकड्यांना धूळ चारली . मात्र या सामन्यात पाकिस्तान खेळाडूंचं जे वागणं होतं ते काही वेगळंच दर्शवत होतं. आधी साहिबजादा फरहानचे गन सेलिब्रेशन आणि त्यानंतर हारिस रौफने प्लेन पाडण्याची ॲक्शन केली. हारिस रौफचा प्लेन क्रॅश व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. तर त्यापूर्वी याच हारिस रौफचा अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलशी मोठा वादही झाला. त्यानंतरच त्याचा प्लेन क्रॅश व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे.
हारिस रौफने का केली ती हरकत ?
काल झालेल्या भारताविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना हरिस रौफने विमानातून खाली पडणारी ॲक्शन केली. पण त्याने असं का केलं असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. ती ॲक्शन म्हणजे विजयी सेलिब्रेशन करण्याची त्याची पद्धत होती का ? याचं उत्तर हो असं असे तर मॅच संपण्यापूर्वीच, तयाचा निकाल लागण्यापूर्वीच असं सेलिब्रेशन कोण करतं ? त्यामुळे त्याची ही ॲक्शन म्हणजे, त्याच्या मनात साठलेला राग होता, बाकी काही नाही, हे अगदी स्पष्ट होतं.
Haris Rauf never disappoints, specially with 6-0. pic.twitter.com/vsfKKt1SPZ
— Ihtisham Ul Haq (@iihtishamm) September 21, 2025
चाहत्यांनी दाखवली जागा, कोहलीच्या नावाचे दिले नारे
पाकिस्तानी खेळाडू हरिस रौफच्या प्लेन ड्रॉप परफॉर्मन्सचा व्हिडिओ समोर येताच, आणखी एक घटना घडली. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या रौफला स्टेडियममधील भारतीय चाहत्यांनी थेट त्याची जागा दाखवून दिली. त्यांनी त्याला विराट कोहलीची आठवण करून दिली. रौफची ॲक्शन पाहताच चाहत्यांनी थेट “कोहली, कोहली!” असे जयघोष करायला सुरुवात केली. ते ऐकून मात्र रौफच्या तोंडावर 12 वाजल्याचे भाव होते, चाहत्यांचा जयघोष ऐकूनीह त्याने काहीच ऐकल्यासारखं केलं, पण त्याचा चेहरा मात्र चांगलाच पडला होता.
Indians chanting KOHLI KOHLI after seeing Haris Rauf 🤣🤣🤣#INDvPAK #AsiaCup2025 pic.twitter.com/zL7cRbopQM
— Vinesh Prabhu (@vlp1994) September 21, 2025
रौफच्या प्रदर्शनावर भारताने फेरलं पाणी
कालच्या भारताविरुद्धच्या सुपर 4 सामन्यात हरिस रौफच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 4 षटकांत 26 धावा देत 2 बळी घेतले. तो पाकिस्तानचा सर्वात किफायतशीर आणि सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मात्र, भारताने 7 चेंडू शिल्लक असताना 6 गडी राखून सामना जिंकला तेव्हा त्याच्या कामगिरीवर पाणी फिरलं.