Asian Games 2026 : शूटिंगमध्ये पुन्हा एकदा भारतीय नेमबाज सरस, एशियन गेम्समध्ये दुसऱ्यादिवशी पदकाने खातं उघडलं

Asian Games 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या दुसऱ्यादिवशी भारताने आपलं पहिलं मेडल जिंकून खातं उघडलं आहे. पुन्हा एकदा नेमबाजांनी भारताची शान उंचावली.

Asian Games 2026 : शूटिंगमध्ये पुन्हा एकदा भारतीय नेमबाज सरस, एशियन गेम्समध्ये दुसऱ्यादिवशी पदकाने खातं उघडलं
Indian Shooters
Image Credit source: x
| Updated on: Sep 21, 2026 | 9:11 AM

आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 च्या दुसऱ्यादिवशी भारताने आपलं पहिलं मेडल जिंकून खातं उघडलं आहे. भारताला मिळालेलं हे तिसरं मेडल आहे. नेमबाजीत भारताला हे पदक मिळालय. याआधीही पहिली दोन्ही मेड्लस भारताने नेमबाजीत मिळवली होती. आता पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल टीम इवेंटमध्ये भारताने सिल्वर मेडल जिंकलं आहे. भारताला हे मेडल पार्थ माने, रुद्रांक्ष पाटिल आणि हिमांशु ढिल्लन यांच्या तिकडीने मिळवून दिलं. पार्थ माने, रुद्रांक्ष पाटिल आणि हिमांशु ढिल्लन यांच्या तिकडीने 10 मीटर एअर रायफल पुरुष टीम इवेंटच्या फायनलमध्ये 1890.1 स्कोर करुन दुसरं स्थान मिळवलं. यात 631.8 स्कोर रुद्रांक्ष पाटिलने केला. 630.0 स्कोर हिमांशु ढिल्लनने केला. पार्थ मानेने 628.3 गुण मिळवले. चीनने 10 मीटर एअर रायफल मेंस टीम इवेंटमध्ये सुवर्ण पदक जिंकलं. त्यांनी 1899 पॉइंट्स स्कोर केले.

याआधी आशियाई गेम्सच्या पहिल्या दिवशी 10 मीटर एअर रायफल वुमेंस टीम इवेंटमध्ये भारताने रौप्यपदक विजेती कामगिरी केली होती. एलावेनिल वलारिवन, सोनम मस्कर आणि विदरसा विनोद या भारतीय तिकडीने पदक विजेती कामगिरी केली. आशियाई गेम्समध्ये भारताने जिंकलेलं हे पहिलं मेडल ठरलं होतं.

आता इंडिविजुअल इवेंटमध्ये सुद्धा मेडलची अपेक्षा

रुद्रांक्ष पाटिल आणि हिमांशु ढिल्लन यांनी 10 मीटर एअर रायफल मेंस इवेंटच्या व्यक्तिगत गटात फायनलमध्ये क्वालिफाय केलय. हे दोन्ही नेमबाज रँकिंगमध्ये तिसऱ्या आणि सातव्या नंबरवर आहेत. पार्थ माने इंडिविजुअल फायनलच्या शर्यतीतून बाद झाला आहे. टीम इवेंटनंतर भारताला आता इंडिविजुअल इवेंटमध्ये सुद्धा मेडलची अपेक्षा आहे. इंडिविजुअल इवेंटची फायनल भारतीय वेळेनुसार सकाळी 9 वाजता होईल.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us