T20 World Cup 2022 : सिडनीच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड आज भिडणार

ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांच्यातील मॅच आज सीडनी येथील एमसीजी मैदानावर खेळवला जाणार आहे.

T20 World Cup 2022 : सिडनीच्या मैदानात ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड आज भिडणार
Australia vs New Zealand
Image Credit source: twitter
| Updated on: Oct 22, 2022 | 8:33 AM

मागच्या रविवारी ऑस्ट्रेलियात विश्वचषक (T20 World Cup 2022) स्पर्धेला सुरुवात झाली. तेव्हापासून क्रिकेटचे चाहते सोशल मीडियावर (Social Media) अधिक आक्रमक झाले आहेत. आजपासून सुपर 12 च्या टप्प्यातील मॅचेस सुरु होणार आहे. आज सिडनीच्या मैदानावर (Sydney Stadium) ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड (Australia vs New Zealand) यांच्यात मॅच होणार आहे. आजच्या मॅचमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण ऑस्ट्रेलियाच्या टीमची कामगिरी सराव सामन्यात म्हणावी इतकी चांगली राहिलेली नाही. तसेच न्यूझीलंडचे काही खेळाडू सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत.

ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड यांच्यातील मॅच आज सीडनी येथील एमसीजी मैदानावर खेळवला जाणार आहे. दुपारी साडेबारा वाजता मॅचला सुरुवात होईल. स्टार स्पोटर्स नेटवर्कवरती हा सामना पाहायला मिळणार आहे.

ऑस्ट्रेलियन टीम

अॅरॉन फिंच (कर्णधार), मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, मार्कस स्टॉइनिस, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा .

न्यूझीलंड टीम

केन विल्यमसन (कर्णधार), टिम साऊदी, ईश सोधी, मिचेल सँटनर, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, डॅरिल मिशेल, अॅडम मिल्ने, मार्टिन गुप्टिल, लॉकी फर्ग्युसन, डेव्हन कॉनवे, मार्क चॅपमन, मायकेल ब्रेसवेल, ट्रेंट बोल्ट, फिन एलेन .