
मेलबर्न : T20 विश्वचषक 2022 च्या (T20 World cup 2022) खऱ्या मॅचेसला आजपासून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाच्या (Australia) मायभूमीत त्याच्याविरुद्ध न्यूझीलंडच्या (Nz) टीमने 200 इतकी धावसंख्या उभारली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज आता कशी फलंदाजी करणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकल्यानंतर प्रथम फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला. परंतु न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची धुलाई केली.
विशेष म्हणजे डेव्हिड कॉनवेने न्यूझीलंडकडून नाबाद 92 धावांची खेळी केली. ज्यामध्ये त्याने 7 चौकार, 2 षटकार मारले. शेवटी, जिमी नीशमनेही 13 चेंडूत 26 धावा केल्या, ज्यात त्याने 2 षटकार ठोकले आहेत. त्यामुळे न्यूझीलंडने 200 धावसंख्या उभारली.
ऑस्ट्रेलियाची निम्मी टीम 10 ओव्हरमध्ये बाद झाली आहे. सध्याची ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 73 एवढी आहे. त्यामुळे इतर खेळाडूंना संभाळून फलंदाजी करावी लागणार आहे.
ऑस्ट्रेलिया टीम
आरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टीम डेव्हिड. मॅथ्यू वेड, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड
न्यूझीलंड टीम
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सँटनर, ईश सोधी. टिम साउथी. लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट