दोन खेळाडूंना T20 विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्याने अझरुद्दीन संतापला

T20 विश्वचषकाच्या टीममध्ये मोहम्मद शमी और श्रेयस अय्यर यांचा राखीव खेळाडूमध्ये समावेश केल्यामुळे भारताचा माजी कर्णधार अझरुद्दीन चांगलाचं संपातला आहे.

दोन खेळाडूंना T20 विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्याने अझरुद्दीन संतापला
दोन खेळाडूंना T20 विश्वचषकाच्या संघात स्थान न मिळाल्याने अझरुद्दीन संपातला
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 13, 2022 | 11:04 AM

आशिया चषकात (Asia Cup 2022) अनेक खेळाडूंनी चांगली कामगिरी केली नाही. त्यामुळे पुढच्या दौऱ्यात अनेकांना संधी मिळणार नाही असं वाटतं होतं. तसेच नव्या चेहऱ्यांना संधी मिळेल अशी चाहत्यांनी शक्यता व्यक्त केली होती. आशिया चषकात काही महत्त्वाच्या सामन्यामध्ये गोलंदाजांनी (Bowler) पुर्ण निराशा केली. त्यामुळे टीम इंडियाला (Team India) आशिया चषकातून बाहेर पडावे लागले.

T20 विश्वचषकाच्या टीममध्ये मोहम्मद शमी और श्रेयस अय्यर यांचा राखीव खेळाडूमध्ये समावेश केल्यामुळे भारताचा माजी कर्णधार अझरुद्दीन चांगलाचं संतापला आहे. तसं त्याने एक ट्विट सुद्धा केलं आहे. त्याची पुन्हा सोशल मिडीयावर अधिक चर्चा आहे.

रोहित शर्मा शिवाय विराट कोहली, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, ऋषभ पंत, केएल राहुल, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव हे गेल्या टी-२० विश्वचषकात खेळले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे दीर्घ अनुभव आहे.

इशान किशनच्या जागी दिनेश कार्तिक, रवींद्र जडेजाच्या जागी अक्षर पटेल, राहुल चहरच्या जागी युझवेंद्र चहल, मोहम्मद शमीच्या जागी अर्शदीप सिंग, शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक हुडा आणि हर्षल पटेल यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रविंद्र जडेच्या झालेल्या दुखापतीमुळे T20 विश्वचषकात खेळत नाही.

T20 विश्वचषकासाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग