
सिडनी : पाकिस्तान टीमचे (pakistan) फलंदाज सुरुवातीला बाद झाले. त्यामुळे टीमची धावसंख्या जेमतेम होईल असं वाटतं होतं. परंतु पाकिस्तान टीमच्या मिडल ऑडरने चांगली फलंदाजी केली. त्यामुळे पाकिस्तान टीमची धावसंख्या 177 झाली आहे. पाकिस्तान टीमचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याचा सध्या खराब फॉर्म सुरु आहे. आजच्या मॅचमध्ये तो पटकन बाद झाला, त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.
काही चेंडू खेळल्यानंतर पाकचा कर्णधार बाबर आझम याने उत्तुंग फटका मारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा तो प्रयत्न फसला, आणि तो बाद झाला. ज्यावेळी चेंडू हवेत गेला त्यावेळी त्याचा अंदाज आफ्रिकेचा गोलंदाज रबाडा झेल मारुन पकडला. ज्यावेळी झेल पकडला त्यानंतर रबाडासह टीममधील खेळाडूंनी आनंद साजरा केला.
दक्षिण आफ्रिका (प्लेइंग इलेव्हन):
क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), टेम्बा बावुमा, रिले रॉसौ, एडन मार्कराम, हेन्रिक क्लासेन, ट्रिस्टन स्टब्स, वेन पारनेल, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एनरिक नॉर्टजे, तबरेझ शम्सी
पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन):
मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), बाबर आझम (क), मोहम्मद हरिस, शान मसूद, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम जूनियर, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह