Babar Azam : बाबर आझमचे ‘झिम्बाब्वे’चे चुकीचे स्पेलिंग लिहिलेले जुने ट्विट व्हायरल, पाहा काय लिहिलंय

नुकत्याचं झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या टीमचा पराभव झाला.

Babar Azam : बाबर आझमचे झिम्बाब्वेचे चुकीचे स्पेलिंग लिहिलेले जुने ट्विट व्हायरल, पाहा काय लिहिलंय
बाबर आझम
Image Credit source: social
| Updated on: Oct 29, 2022 | 11:09 AM

नवी दिल्ली : टीम इंडियाने (Team India) पाकिस्तान टीमचा (Pakistan) पराभव केल्यापासून पाकिस्तान टीममधील प्रत्येक खेळाडूवर सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यामातून टीका होत आहे. ज्यावेळी टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात रोमांचक मॅच सुरु होती. त्यावेळी टीम इंडियाच्या फिरकी गोलंदाजांने विजयी चौकार मारला. त्यानंतर पाकिस्तानच्या अनेक चाहत्यांनी टिव्ही फोडले त्याचा व्हिडीओ सुध्दा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नुकत्याचं झालेल्या झिम्बाब्वे विरुद्धच्या मॅचमध्ये पाकिस्तानच्या टीमचा पराभव झाला. त्यानंतर मात्र पाकिस्तानच्या माजी खेळाडूंनी टीममध्ये असलेल्या खेळाडूंवर सडकून टीका केली. त्या मॅचमध्ये अनेक खेळाडूंनी चुकी केल्या, तसेच चुकीचे निर्णय घेतले असल्याचे मतं पाकिस्तानच्या माजी दिग्गज खेळाडूंनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे शोएब मलिक याला टीममध्ये का घेतलं नाही. तो तंदुरुस्त आहे. तो टीममध्ये असता तर मधली फलंदाजांची फळी एकदम मजबूत झाली असती असं वसीम आक्रम याने एका मुलाखतीतं सांगितलं आहे.

सध्या बाबर आझमचं एक ट्विट व्हायरल झालं आहे. हे ट्विट साधारण 2015 मधील आहे. त्यावेळी बाबर आझमने झिम्बाब्वे लिहिताना चुकी केली होती. ते आता अधिक व्हायरल झालं आहे.