Video : 0,6,6,6,6,6! ‘बेबी एबी’ने घातला गोंधळ

सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स आणि ट्रिनबागो नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान पाच षटकार खेचले आहेत.

Video : 0,6,6,6,6,6! बेबी एबीने घातला गोंधळ
Baby AB
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Sep 23, 2022 | 11:26 AM

‘बेबी एबी'(Baby AB) या नावाने प्रसिद्ध असलेला डेवाल्ड ब्रेविस (Dewald Brevis) याने काल चमकदार कामगिरी केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल झाला आहे. त्याने एका ओव्हरमध्ये सलग पाच षटकार लगावले आहेत. कॅरेबियन प्रीमियर लीग 2022 सध्या सुरु आहे, तिथं 26 व्या सामन्यात त्याच्याकडून हा कारनामा करण्यात आला आहे.

सेंट किट्स आणि नेव्हिस पॅट्रियट्स आणि ट्रिनबागो नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान पाच षटकार खेचले आहेत. सुरुवातीचा एक चेंडू युवा खेळाडूने खेळल्यानंतर बेबी एबी पुढच्या पाच चेंडूवर पाच षटकार खेचले. त्यामुळे मैदानात मॅच पाहायला उपस्थित असलेल्या चाहत्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला.

सेंट किंट्स आणि नेविस पॅट्रियट्स संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 6 बाद 163 धावसंख्या उभारली. त्यात शेरफेन रदरफोर्डने 50 चेंडूत 78 धावा केल्या आहेत.

बेबी एबी अठरावी ओव्हर सुरु असताना बॅटिंग करायला आला होता. त्या ओव्हरमध्ये त्याला फक्त एक चेंडू खेळायला मिळाला. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये त्याने धमाका केला.