Wrestlers Protest : ‘सांगा कुठे येऊ गोळी खायला? शप्पथ पाठ नाही दाखवणार’, बजरंग पुनियाच माजी DGP ना प्रत्युत्तर

| Updated on: May 29, 2023 | 3:13 PM

Wrestlers Protest : "गरज पडल्यास गोळी चालवेन. आता तर कचऱ्याच्या गोणीसारखं खेचून फेकून दिलय. अनुच्छेद 129 अंतर्गत पोलिसांना गोळी मारण्याचा अधिकार आहे"

Wrestlers Protest : सांगा कुठे येऊ गोळी खायला? शप्पथ पाठ नाही दाखवणार, बजरंग पुनियाच माजी DGP ना प्रत्युत्तर
Bajran punia
Follow us on

नवी दिल्ली : दिग्गज कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि केरळचे माजी पोलीस महासंचालक (DGP) एनसी अस्थाना यांच्यात सोशल मीडियावर वादावादी सुरु आहे. अस्थाना यांनी बजरंग पुनियाला इशारा दिला की, गरज पडली तर पोलीस, आंदोलक कुस्तीपटूंवर गोळ्या चालवतील. आस्थाना यांच्या टि्वटला पुनियाने उत्तर दिलय. मी छातीवर गोळी झेलण्यास तयार आहे, असं बजरंग पुनियाने म्हटलय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी नव्या संसद भवनाच उद्घाटन केलं. तिथून जेमतेम 3 किलोमीटर अंतरावर जंतर-मंतर येथे पोलीस आणि आंदोलक कुस्तीपटूंमध्ये झडप झाली. त्यानंतर बजरंग पुनिया आणि अस्थाना यांच्यात शाब्दीक वाद रंगला आहे. जंतर-मंतरवर आंदोलन करणारे कुस्तीपटू नव्या संसद भवनाच्या दिशेने कूच करत होते. त्यावेळी पोलिसांनी कुस्तीपटूंना ताब्यात घेतलं.

गाद्या, पंखे आणि छप्पर हटवलं

पोलीस रविवारी अनेक कुस्तीपटू आणि आंदोलकांना बसमध्ये भरुन दुसऱ्याठिकाणी घेऊन गेले. पोलिसांनी आंदोलन स्थळी असलेल्या गाद्या, पंखे आणि छप्पर हटवलं. त्यांनी विरोध स्थळाची जागा साफ केली. रविवारी रात्री एनसी अस्थाना यांनी एक न्यूज रिपोर्ट् रिटि्वट केलं.

अस्थाना यांचं वादग्रस्त टि्वट

त्यामध्ये त्यांनी “गरज पडल्यास गोळी चालवेन. आता तर कचऱ्याच्या गोणीसारखं खेचून फेकून दिलय. अनुच्छेद 129 अंतर्गत पोलिसांना गोळी मारण्याचा अधिकार आहे. योग्यवेळी ती इच्छा देखील पूर्ण होईल. यासाठी सुशिक्षित असलं पाहिजे. मग पोस्टमार्टम टेबलवर भेटूया” असं एनसी अस्थाना यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटलय.
दुसऱ्या एका टि्वटमध्ये डीजीपी म्हणाले की, “काही मूर्ख पोलिसांच्या मनात गोळी मारण्याच्या अधिकाराबद्दल संशय आहे. जर तुम्हाला इंग्रजी वाचता येत असेल, तर तो अखिलेश प्रसादच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निर्णय वाचा”


बजरंग पुनियाने टि्वटमध्ये काय म्हटलय?

माजी आयपीएस अधिकारी आस्थाना यांच्या टि्वटवर बजरंग पुनियाचने प्रतिक्रिया दिली आहे. “IPS ऑफिसर आम्हाला गोळी मारण्याबद्दल बोलत आहे. भावा, समोर उभा आहे. गोळी खाण्यासाठी कुठे येऊ ते सांगा, शप्पथ आहे, पाठ नाही दाखवणार. छातीवर गोळी खाईन” असं बजरंग पुनियाने टि्वटमध्ये म्हटलय.

कुस्ती महासंघाचे प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांना पदावरुन हटवाव त्यांना अटक करावी, अशी या कुस्तीपटूंची मागणी आहे. महिला कुस्तीपटूंच लैंगिक शोषण केल्याचा आरोप बृजभूषण शरण सिंह यांच्यावर आहे.