
शाकिब अल हसन (Shakib Al Hasan)... बांगलादेश क्रिकेट संघातला एक अष्टपैलू खेळाडू आणि जागतिक क्रिकेटमधलं एक दिग्गज नाव... त्याच्या क्रिकेटमधील रेकॉर्ड्सवर अनेकदा चर्चा होते. पण आज आम्ही तुम्हाला त्याच्या खास लव्ह स्टोरीबद्दल सांगणार आहोत... शाकिबच्या लव्ह स्टोरीला इंग्लंडमधून सुरुवात झाली...

उम्मी अहमद शिशिर (Umme Ahmed Shishir) असं शाकिबच्या पत्नीचं नाव आहे. शाकिब 2010 साली कौंटी क्रिकेट खेळण्यासाठी इंग्लंडला गेला होता. त्यावेळी उम्मीला तो पहिल्यांदा भेटला. खरंतर उम्मी मूळची बांगलादेशी पण ती 10 वर्षांची असताना त्यांचं सर्व कुटुंब अमेरिकेत स्थायिक झालं. उम्मीचं सगळं बालपण आणि शिक्षण अमेरिकेतच झालं...

शाकिब 2010 साली कौंटी क्रिकेटसाठी इंग्लंडला गेला होता तर उम्मी सुट्ट्या घालवण्यासाठी इंग्लंडला आली होती. त्यावेळी एकाच हॉटेलमध्ये दोघेही थांबले होते. त्यावेळी तिथे त्यांची ओळख झाली आणि पुढच्या काही दिवसांत त्यांची चांगली मैत्री देखील झाली. मग मात्र त्यांच्यात प्रेमाचा वसंत कधी फुलला, हे दोघांनाही समजलं नाही.

दिवसांमागून दिवस जात होते, महिने जात होते... एकमेकांना एकमेकांशिवाय करमत नव्हतं... काही केल्या त्यांना चैन पडत नव्हती... अखेर त्यांनी आयुष्यभरासाठी एक होण्याचा निर्णय घेतला... 12 डिसेंबर 2012 साली ;मैं तुझे कबूल, तु मुझे कबूल'चा सोहळा पार पाडला.

लग्नानंतरच्या तीन वर्षात म्हणजेच 2015 साली त्यांना एक मुलगी झाली. जिचं नाव त्यांनी अलायना ठेवलं. आता मागील वर्षीच 2020 मध्ये शाकिब-उम्मीने आणखी एका मुलीला जन्म दिलाय.

शाकिबला त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर बोललेलं आवडत नाही किंबहुना त्याला ते पसंत नाहीय. परंतु शाकिबची पत्नी एका कारणामुळे चर्चेत आली... ते कारण होतं, भारत आणि बांगलादेशदरम्यान 2014 साली मिरपूरमधल्या मॅचवेळी शाकिबने एका बिझनेसमनच्या मुलाची जोरदार पिटाई केली. कारण त्याने उम्मीची म्हणजेच शाकिबच्या बायकोची छेड काढली होती. त्यावेळी जगभरातील मीडियाने यासंबंधीचं वृत्त दिलं होतं...