
सध्या आयपीएलची धुम सुरु आहे. परंतु या आयपीएलसोबत देशात लग्नांचा सीजनदेखील सुरु झाला आहे. परंतु बांगलादेशात एकाच वेळी लग्न आणि क्रिकेटची जुगलबंदी पाहायला मिळाली. बांगलादेशातल्या एका क्रिकेटरने क्रिकेट खेळत तिचं वेडिंग फोटोशुट केलं आहे.

क्रिकेट खेळत वेडिंग फोटोशूट करणाऱ्या या महिला खेळाडूचं नाव आहे संजीदा इस्लाम. तिने बांगलादेश क्रिकेट संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे.

संजीदाने नवरीप्रमाणे सजून फलंदाजी करत वेडिंग फोटोशुट केलं आहे. तिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ICC नेदेखील तिचे फोटो फेसबुकवर शेअर केले आहेत.

संजिता बांगलादेशमधील रंगपूरची रहिवासी असून तिने रंगपूरचा फर्स्ट क्लास क्रिकेटर मीम मोसाडेक याच्याशी 18 ऑक्टोबर रोजी विवाह केला आहे.

23 वर्षीय संजिदा बांगलादेशकडून 16 एकदिवसीय आणि 54 टी-20 सामने खेळली आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये तिच्या नावावर 174 धावा आहेत, तर टी-20 क्रिकेटमध्ये तिने 520 धावा जमवल्या आहेत.