AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : रोहित शर्मा, हार्दिक पंड्या यांच्याबद्दल बीसीसीआयच्या मनात मोठा संशय, हे दोघे…

Team India : रोहित शर्मा, हार्दिक पंड्या हे टीम इंडियाचे स्टार खेळाडू आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक सामने भारताला जिंकून दिले आहेत. पण आता बीसीसीआयच्या मनात या दोघांबद्दल संशयाचं धुकं आहे.

Team India : रोहित शर्मा, हार्दिक पंड्या यांच्याबद्दल बीसीसीआयच्या मनात मोठा संशय, हे दोघे...
Hardik Pandya-Rohit Sharma Image Credit source: Getty Images
| Updated on: May 21, 2026 | 4:57 PM
Share

आयपीएल 2026 चा सीजन आता संपत आला आहे. टीम इंडिया अफगाणिस्तान विरुद्ध तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळणार आहे. त्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने टीम इंडियाची घोषणा केली आहे. निवड समितीने पुढच्यावर्षी होणारा वनडे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन अफगाणिस्तान सीरीजसाठी टीमची घोषणा केली. निवड समितीने दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपची तयारी सुरु केली आहे. बीसीसीआयला रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या फिटनेसबद्दल चिंता आहे. त्या दोघांची अफगाणिस्तान विरूद्धच्या वनडे सीरीजसाठी टीममध्ये निवड केली आहे. 50 ओव्हरचं सर्वोच्च स्तराच क्रिकेट खेळण्यासाठी दोघे सक्षम आहेत का? या बद्दल बीसीसीआयच्या मनात शंका आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

वनडे क्रिकेटध्ये प्रत्येक गोलंदाजाला 10 षटकं गोलंदाजी करता येते. हार्दिक पूर्ण 10 ओव्हर टाकू शकेल का? या बद्दल निवड समिती, टीम मॅनेजमेंट आणि बीसीसीआय यांना खात्री नाहीय. तेच रोहित शर्माबद्दलही आहे. पुढच्यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपपर्यंत रोहितचा फिटनेस राहिल का? ही भिती आहे. हॅम स्ट्रिंग इंजरीमुळे रोहित शर्मा तीन आठवडे आयपीएलमध्ये खेळू शकला नव्हता. बीसीसीआयने रोहितचा फिटनेस रिपोर्ट मागितला आहे. त्या तीन आठवड्यात रोहित बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सिलन्समध्ये आला नाही. रोहितला 50 ओव्हर फिल्डिंग करायची आहे. त्यासाठी रोहितचं शरीर तयार आहे का? आयपीएल सारखा वनडे क्रिकेटमध्ये इम्पॅक्ट प्लेयरचा पर्याय नसतो. जेव्हा तुम्ही वयाच्या चाळीशीत येता, तेव्हा शरीराला बर व्हायला वेळ लागतो असं बीसीसीआय सूत्रांनी सांगितलं.

सगळे सामने खेळलेला नाही

हार्दिक पंड्या सुद्धा या सीजनमध्ये मुंबई इंडियन्ससाठी सगळे सामने खेळलेला नाही. चेन्नई सुपर किंग्स विरूद्धच्या सामन्यानंतर त्याने पाठिच्या दुखण्याची तक्रार केली होती. त्याने वानखेडे स्टेडियम आणि रिलायन्स फॅसिलिटीमध्ये ट्रेनिंग केली. तो आता पुन्हा जॉइंन झालाय. कालच कोलकाता नाइट रायडर्स विरूद्धच्या सामन्यात खेळला. तो 10 ओव्हर टाकू शकतो का? ही सिलेक्टर्सना मुख्य चिंता आहे. 2023 चा वनडे वर्ल्ड कप भारतात झाला होता. त्यावेळी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या दोन टी20 वर्ल्ड कपमध्ये 2024 आणि 2026 चं विजेतेपद भारताने पटकावलं. भारताने 2011 साली शेवटचा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...