IPL 2026 : हार्दिक पंड्याला मानलं, जो शब्द दिला तो पाळला, वानखेडेवरच्या ग्राऊंड स्टाफला 10-10 लाखांचे चेक वाटले, पण का?

IPL 2026 : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने IPL चा नवीन सीजन सुरु होण्याआधी वानखेडे स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफला एक खास इनाम दिलं आहे. हार्दिकने लाखो रुपये ग्राऊंड स्टाफला का दिले? त्यामागचं कारण खास आहे.

IPL 2026 : हार्दिक पंड्याला मानलं, जो शब्द दिला तो पाळला, वानखेडेवरच्या ग्राऊंड स्टाफला 10-10 लाखांचे चेक वाटले, पण का?
Hardik pandya
Image Credit source: PTI
| Updated on: Mar 27, 2026 | 1:41 PM

टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पंड्या त्याचा खेळ आणि क्रिकेट व्यतिरिक्त कारणांसाठी सुद्धा नेहमीच चर्चेत असतो. मग, त्याची गर्लफ्रेंड असो किंवा लाइफस्टाइल. टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर खरंतर चर्चा हार्दिक पंड्याच्या खेळाची व्हायला पाहिजे होती. पण मैदानावरील त्याचा गर्लफ्रेंड सोबतचा रोमान्स चर्चेचा विषय ठरला. सोशल मीडियावर त्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. यासाठी हार्दिकवर टीका सुद्धा झाली. पण हार्दिक पंड्याला याने काही फरक पडत नाही. तो त्याला हवं तसच जगतो. क्रिकेटच्या बरोबरीने हार्दिक पंड्याची महागडी लाइफस्टाईल सुद्धा चर्चेचा विषय असते. महागड्या घड्याळांपासून महागडी स्पोर्ट्स् कार अशा आपल्या ऐशोआरामी गोष्टींसाठी सुद्धा हार्दिक ओळखला जातो.

मैदानाबाहेरील वर्तनामुळे हार्दिक पंड्या टीकाकारांच्या रडारवर असला तरी तो एक दिलदार मनाचा व्यक्ती आहे. अनेकदा हे दिसून आलय. यावेळी हार्दिकच्या व्यक्तीमत्वाची अशी बाजू पहायला मिळाली, जी पूर्णपणे वेगळी आहे. हार्दिकने मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरील ग्राऊंडस्टाफला एका खास कारणासाठी 10-10 लाख रुपयांच्या चेकचं वाटप केलं.

तुम्ही विचार करताय तसं बिलकुलही नाहीय

IPL 2026 चा सीजन सुरु होण्याआधी मुंबई इंडियन्सचा कॅप्टन हार्दिक पंड्याने वानखेडे स्टेडियमवरील मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या ग्राऊंड स्टाफमधील 10 ते 11 जणांना हे चेक वाटले. यावरुन तुम्ही असा अंदाज लावाल की, हार्दिकने आयपीएलमध्ये मनासारखा पीच बनवण्यासाठी या चेकचं वाटप केलं असेल. पण तुम्ही विचार करताय तसं बिलकुलही नाहीय. हार्दिकने हे जे मन जिंकणारं काम केलय. त्यामागे त्याने दिलेला शब्द आहे.

हार्दिकने ही मदत का केली?

मिळालेल्या माहितीनुसार, हार्दिकने वानखेडेच्या ग्राऊंड स्टाफला 10-10 लाख रुपये यासाठी दिलेत, कारण त्यांनी काही काळापूर्वी हार्दिकची मदत केली होती. रिपोर्ट्नुसार टी 20 वर्ल्ड कप आधी हार्दिक पंड्या वानखेडेवर तयारी करत होता. यावेळी तो अनेकदा रात्री प्रॅक्टिससाठी यायचा. त्यामुळे ग्राऊंड स्टाफला जास्तवेळ मैदानावर थांबावं लागायचं. पण त्यांनी हार्दिकच्या तयारीत कुठलीही कसर ठेवली नाही.

मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनचं सर्वत्र कौतुक

हार्दिक पंड्याने त्यांना शब्द दिलेला की, तो परत येईल तेव्हा त्यांना बक्षीस देईल. मुंबई इंडियन्सचा कॅप्टन आपला शब्द विसरला नाही. त्याने तो पूर्ण केला. मुंबई इंडियन्सच्या एका प्रॅक्टिस सेशन नंतर हार्दिकने सर्व सदस्यांना 10-10 लाख रुपयांचे चेक दिले, ज्यांनी प्रॅक्सिटसवेळी त्याला मदत केली होती. या सर्वांनी हार्दिक सोबत फोटो काढला. हार्दिकच्या या कृतीची सोशल मीडियावर भरपूर चर्चा होते. मुंबई इंडियन्सच्या कॅप्टनचं सर्वचजण कौतुक करतायत.

 

Follow Us