AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या चष्म्याच्या दांडीवर असणाऱ्या आकड्यांचा अर्थ काय? यापूर्वी कोणीच सांगितली नसेल तुम्हाला माहिती

चष्म्याच्या दांडीवर लिहिलेल्या आकड्यांचा नेमका अर्थ काय आणि त्यावरून तुमच्या चेहऱ्यासाठी योग्य मापाचा चष्मा कसा निवडायचा, याची माहिती या लेखात दिली आहे. हे आकडे समजून घेऊन परफेक्ट फ्रेम कशी निवडावी, ते जाणून घ्या.

| Updated on: Mar 27, 2026 | 1:58 PM
Share
आपल्यापैकी अनेकजण दररोज चष्मा वापरतात. काहीजण फॅशनसाठी तर काहीजण दृष्टीदोषामुळे. नवीन चष्मा खरेदी करताना आपण अनेकदा फ्रेमचा रंग, आकार आणि ती आपल्या चेहऱ्यावर कशी दिसते, यावरच लक्ष केंद्रित करतो. पण, तुम्ही कधी तुमच्या जुन्या चष्म्याच्या दांडीच्या आतील बाजूला बारकाईने पाहिले आहे का?

1 / 10
तिथे काही आकडे लिहिलेले असतात जसे की 52 □ 18 - 140. पाहिलात ना.. आता तुम्हाला हे आकडे कसले असा प्रश्न नक्कीच पडला असेल. आज आपण हे आकडे कशासाठी आणि त्याचा अर्थ काय असतो, याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

2 / 10
चष्म्याच्या दांडीच्या आतील बाजूला लिहिलेले हे आकडे म्हणजे तुमच्या चष्म्याचे सिक्रेट माप असते. या आकड्यांचा अर्थ समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण यामुळेच तुम्हाला तुमच्या चेहऱ्यासाठी परफेक्ट बसणारा आणि आरामदायी चष्मा निवडता येतो.

3 / 10
सहसा, चष्म्याच्या फ्रेमवर तीन किंवा चार संख्यांचे संच असतात. हे सर्व आकडे मिलिमीटर (mm) मध्ये असतात. उदाहरणार्थ, जर तुमच्या चष्म्याच्या दांडीवर '52 □ 18 - 140' असे लिहिले असेल तर त्यातील पहिला आकडा (उदा. 52) एका लेन्सची रुंदी दर्शवतो.

4 / 10
हे माप एका बाजूपासून दुसऱ्या बाजूला, लेन्सच्या मध्यभागी घेतले जाते. तुमच्या चेहऱ्याची रुंदी आणि डोळ्यांमधील अंतर यावर हे माप अवलंबून असते. तुमचा चेहरा लहान असल्यास तुम्हाला लहान लेन्सच्या (उदा. ४८-५० मिमी) फ्रेम योग्य ठरतात. तर मोठ्या चेहऱ्यासाठी मोठ्या लेन्सच्या (उदा. ५३ मिमी पेक्षा जास्त) फ्रेम योग्य असतात.

5 / 10
यानतंरच दुसरा आकडा म्हणजेच 18 हा दोन लेन्सच्या मधल्या भागाचे, म्हणजेच पुलाचे (Bridge) अंतर दर्शवतो. हे तुमच्या नाकाच्या रुंदीनुसार ठरते. योग्य पुलाचे अंतर असलेला चष्मा नाकावर व्यवस्थित बसतो, टोचत नाही किंवा सारखा खाली घसरत नाही.

6 / 10
यानतंरचा तिसरा आकडा हा दांडीची लांबी सांगतो. हा सहसा सर्वात मोठा आकडा असून तो चष्म्याच्या दांडीची एकूण लांबी दर्शवतो. हे माप फ्रेमच्या पुढील कोपऱ्यापासून दांडीच्या शेवटच्या टोकापर्यंत घेतले जाते.

7 / 10
दांडीची लांबी योग्य असल्यास चष्मा कानामागे व्यवस्थित बसतो आणि दाब देत नाही. जर दांडी खूप लहान असल्यास चष्मा कानामागे टोचू शकतो, तर खूप लांब असल्यास तो सैल होऊ शकतो.

8 / 10
फ्रेमवरील हे आकडे फक्त फ्रेमच्या आकारासाठी आहेत. ते तुमच्या डोळ्यांच्या नंबर (पॉवर) चे आकडे नसतात. तुमचे डॉक्टर तुम्हाला देत असलेल्या प्रिस्क्रिप्शनवर तुमची पॉवर लिहिलेली असते.

9 / 10
त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही नवीन चष्मा खरेदी करायला जाल, तेव्हा तुमच्या जुन्या, आरामदायी चष्म्याच्या दांडीवरील हे आकडे तपासून पहा. ऑनलाईन चष्मा खरेदी करताना तर हे आकडे अत्यंत उपयुक्त ठरतात. यामुळे तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला परफेक्ट बसणारी फ्रेम निवडणे सोपे जाते. तसेच तुमचा पैसा व वेळ दोन्हीही वाचतो.

10 / 10
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?