AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याआधी डिविलियर्सने सांगितली मुंबई इंडियन्सची कमकुवत बाजू, कुठल्या खेळाडूच्या क्षमतेवर व्यक्त केली शंका?

IPL 2026 : आयपीएलचा 19 वा सीजन उद्यापासून सुरु होणार आहे. सगळ्यांच लक्ष दरवर्षी प्रमाणे मुंबई इंडियन्स टीमच्या कामगिरीकडे असणार आहे. मुंबई इंडियन्स टीममधील एका कमकुवत बाजूकडे प्रसिद्ध क्रिकेटर एबी डिविलियर्सने लक्ष वेधलय.

IPL 2026 : आयपीएल सुरु होण्याआधी डिविलियर्सने सांगितली मुंबई इंडियन्सची कमकुवत बाजू, कुठल्या खेळाडूच्या क्षमतेवर व्यक्त केली शंका?
Mumbai Indians
| Updated on: Mar 27, 2026 | 11:00 AM
Share

दक्षिण आफ्रिकेचा प्रसिद्ध क्रिकेटपटू एबी डिविलियर्सने आयपीएल 2026 मधील मुंबई इंडियन्सच्या टीमबद्दल आपलं मत मांडलं आहे. डिविलियर्स आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळायचा. एबी डिविलियर्सनच्या मते यंदाच्या सीजनसाठी मुंबई इंडियन्सची टीम उत्तम आहे. पण एका खेळाडूबद्दल त्याने शंका व्यक्त केली आहे. या खेळाडूच्या प्रदर्शनाबद्दल डिविलियर्सच्या मनात संशय आहे. ट्रेंट बोल्ट बद्दल डिविलियर्सने शंका व्यक्त केली आहे. डिविलियर्सच्या मते ट्रेंट बोल्ट हा पाचवेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्ससाठी चिंतेचा विषय आहे. क्रिकेटच्या प्रत्येक विभागातील उत्तम जागतिक दर्जाचे खेळाडू असलेला मुंबई इंडियन्सकडे मजबूत संघ आहे असं डिविलियर्सने म्हटलय. जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या आणि सूर्यकुमार यादव सारखे दर्जेदार भारतीय खेळाडू या टीममध्ये आहेत. पण काही कमकुवत बाजू सुद्धा आहेत. त्याचा प्रतिस्पर्धी संघ फायदा उचलू शकतो असं डिविलियर्सला वाटतं.

आयपीएलचा 19 वा सीजन उद्यापासून सुरु होत आहे. मुंबई इंडियन्ससाठी फिरकी गोलंदाजी एक चिंतेचा विषय आहे. त्याशिवाय न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट आता तितका भेदक वाटत नाही, जशी तो आधी गोलंदाजी करायचा. याचा मुंबई इंडियन्सला फटका बसू शकतो असं एबी डिविलियर्सने म्हटलं आहे. अभिनव मुकुंदसह डिविलियर्सने आयपीएलच्या आगामी सीजनचं विश्लेषण केलं. डिविलियर्सच्या मते, बोल्टच्या गोलंदाजीतील वेगाची धार आता कमी झाली आहे. त्यामुळे तो पावरप्ले आणि शेवटच्या ओव्हर्समध्ये तितका घातक वाटत नाही.

आता तितका घातक वाटत नाही

“माझ्यासाठी ट्रेंट बोल्ट एक चिंतेचा विषय आहे. भुवनेश्वर कुमार सारखी त्याची स्थिती आहे. 2018, 2019 आणि 2020 मध्ये तो जितका घातक वाटायचा तसा आता वाटत नाही” असं डिविलियर्स म्हणाला. “ट्रेंट बोल्ट 140 किमीच्या वेगाने गोलंदाजी करताना स्विंग करायचा. मी त्याला SA20 मध्ये खेळताना बघितलं, मला तो महागडा गोलंदाज वाटला” असं डिविलियर्सने म्हटलं.

दक्षिण आफ्रिकेतील टी20 लीगमध्ये कसं प्रदर्शन केलं?

ट्रेंट बोल्ड दक्षिण आफ्रिकेतील टी20 लीगमध्ये मुंबई केप टाऊन टीमकडून खेळला. 10 सामन्यात त्याने फक्त 8 विकेट काढल्या. बोल्टच्या गोलंदाजीतील विकेट काढण्याची जादू कुठेतरी हरवलीय असं वाटतय. या टुर्नामेंटमध्ये त्याने 9.82 च्या सरासरीने गोलंदाजी केली. बोल्टच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य म्हणजे विकेट काढता आल्या नाहीत तरी तो धावा रोखून ठेवायचा. पण हीच जादू आता त्याच्या गोलंदाजीत दिसत नाहीय.

Follow Us
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?
2029 मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होतील का?.
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा
खरातच्या भोंदूगिरीला बळी पडलेल्या राजेंद्र जासूद यांचा खळबळजनक खुलासा.
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात...
चंद्रकांत खैरे यांचा अघोरी पूजेबाबत धक्कादायक दावा, राजकीय वर्तुळात....
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज
आपल्या वयाच्या आधीच दातांचं वय वाढतं? कसं? तुमचं डेंटल एज.
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा
दातांचे वय वाढण्यापूर्वी व्हा सावध; आजच तुमचं डेंटल एज तपासा.
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय
इराण-इस्त्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय.
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय
कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल विक्रीबाबत मोठा निर्णय.
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर...
भोंदू बाबा अशोक खरातला पहिला सर्वात मोठा दणका... अखेर....
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?
चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार?.
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव
भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव.