Rupali Chakankar | रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदावरून जाणार की राहणार? निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर हे नाव पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भोंदूबाबा खरात आणि चाकणकर यांच्यात घरगुती नातेसंबंध असल्याचे बोलले जात आहे, यामुळे महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून चाकणकरांचा राजीनामा घेण्यास पक्षात एकमत झाल्याचे समजते.
भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर हे नाव पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भोंदूबाबा खरात आणि चाकणकर यांच्यात घरगुती नातेसंबंध असल्याचे बोलले जात आहे, यामुळे महिला प्रदेशाध्यक्ष पदावरून चाकणकरांचा राजीनामा घेण्यास पक्षात एकमत झाल्याचे समजते. मंगळवारी देवगिरीवर झालेल्या बैठकीत या राजीनाम्यावर सविस्तर चर्चा झाली. या बैठकीत उपस्थित आमदारांनी चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. चाकणकर यांच्या वर्तणुकीमुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली आहे, असं आमदारांचं म्हणणं आहे. त्यामुळे पक्षाच्या हितासाठी चाकणकर यांचा राजीनामा घेणे आवश्यक आहे. सध्या, चाकणकरांचा राजीनामा घेण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कोर्टात आहे. त्यामुळे यावर सुनेत्रा पवार काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या आधीच रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतरही त्यांच्या विरोधात पक्षात नाराजी होती. त्यामुळे चाकणकर या स्वत:हून महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देतात की त्यांचा राजीनामा घेतला जातो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
Published on: Mar 26, 2026 01:01 PM
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ

