Ashok Kharat | भोंदूबाबा खरात याच्या वडिलांच्या दशक्रिया पत्रिकेत रुपाली चाकणकरचे नाव, निकटवर्तीयांची चौकशी होणार?
भोंदूबाबा खरात प्रकरणात नवे खुलासे समोर येत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, खरातच्या विशेष भक्तांमध्ये एका आमदारांच्या पत्नीचा देखील समावेश असल्याची चर्चा आहे. अधिकृतरित्या कोणतेही नाव जाहीर केलेले नाही, मात्र तपासात तिची भूमिका आणि सहभाग तपासला जाणार आहे. पुढील चौकशीत या बाबतीत धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबरोबरच नाशिकमधील खरात कुटुंबाच्या दशक्रिया विधीची पत्रिका चर्चेत आली आहे. 2017 मध्ये भोंदूंच्या वडिलांच्या दशक्रियेत सहभागी व्यक्तींच्या यादीत माजी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचंही नाव असल्याचे दिसत आहे. रुपाली चाकणकर ह्या प्रकरणात पहिल्या दिवसापासूनच चर्चेत राहिल्या आहेत. या पत्रिकेतून स्पष्ट होते की, सहभागी लोक फक्त संस्थेचे सदस्य किंवा विश्वस्त नसून, खरात याच्या कुटुंबाशी घरगुती नातेसंबंध असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता या संपूर्ण तपासात हे विश्वस्त आणि निकटवर्तीय यांचीही सखोल चौकशी होणार की नाही, याची चर्चा सुरू आहे.
Published on: Mar 26, 2026 12:36 PM
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्