AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगात हाहाकार! रशियाची 40 टक्के तेलाची निर्यात ठप्प, भारतात होणारा तेल पुरवठा…

इराण आणि अमेरिका युद्धामुळे जग संकटात असतानाच अजून एक मोठा धक्का बसला आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती अधिक वाढण्याची शक्यता आहे. जगभरात मोठी खळबळ उडाली आहे. भारतालाही याचा थेट फटका बसणार आहे.

जगात हाहाकार! रशियाची 40 टक्के तेलाची निर्यात ठप्प, भारतात होणारा तेल पुरवठा...
Russia crude oil supply
| Updated on: Mar 27, 2026 | 10:48 AM
Share

28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मिळून मोठा हल्ला इराणवर केला. यानंतर युद्धाला सुरूवात झाली. या युद्धात जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचा भाव गगणाला पोहोचला. यानंतर रशियाच्या तेलावर निर्बंध घालणाऱ्या अमेरिकेने मोठा निर्णय घेत 30 दिवसांकरिता रशियाच्या तेलावरील सर्व निर्बंध हटवले आणि रशियाकडून तेल खरेदी करण्याचे आवाहन केले. त्यापूर्वी रशियाकडून तेल खरेदी करू नये, याकरिता अमेरिकेकडून मोठा दबाव भारतावर होता. यादरम्यान भारताने पुन्हा एकदा रशियाकडून तेल खरेदी केली पण यावेळी रशियाकडून भारताला तेलावर कोणत्याही प्रकारची सूट देण्यात आली नाही. बाजार भावाप्रमाणेच भारताला रशियाकडून तेल खरेदी करावे लागत आहे. भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा आहे. यादरम्यानच भारताच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे.

इराण आणि अमेरिका युद्ध संपण्याचे संकेत असताना मोठा धक्का बसला. युक्रेनने रशियावर केलेल्या हल्ल्यामुळे भारताला धक्का बसला. युक्रेनने मोठा हल्ला रशियाच्या तेल पाईपलाईनवर केला. त्यामध्येच मोठे नुकसान झाले. यासोबतच रशियाचे अनेक टॅंकरही जप्त केले आहेत. यामुळे रशियाच्या तेल निर्यात क्षमतेवर 40 टक्के हिस्सा ठप्प झाला. जगातील दुसऱ्या क्रमांकाचा तेल निर्यात देश असलेल्या रशियावर हे युक्रेनमुळे गंभीर संकट आले.

युक्रेनकडून अशावेळी रशियाच्या कच्च्या तेलासंबंधित पायाभूत सुविधांवर हल्ला करण्यात आला, ज्यावेळी जागतिक बाजारपेठेत अगोदरच कच्च्या तेलाच्या किमती 100 डॉलर प्रति बॅरलवरच्या पुढे पोहोचल्या आहेत. रशियाचा तेल पुरवठा विस्कळीत झाल्याने त्याचा थेट भारतावर परिणाम होतो. सध्याच्या घडीला भारत मोठ्या प्रमाणात रशियाकडून तेल खरेदी करत आहे. अमेरिकेने रशियाच्या तेलावरील निर्बंध हटवल्यानंतर भारताला थेटपणे फायदा होताना दिसला. पण आता पुन्हा एकदा संकट आलंय.

जर रशियाकडून होणारा तेल पुरवठा विस्कळीत झाला तर भारतावर गंभीर परिणाम होऊ शकतात. भारत अगोदरच एलपीजी गॅसच्या संकटातून मार्ग काढताना दिसत आहे. एलपीजी गॅसचा मोठा तुटवडा आहे. रशियाकडून भारतात कच्चे तेल पाठवले जात आहे. पण आता युक्रेनकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर भारतासोबतच इतरही काही देशांच्या चिंतेत वाढ झाली.

Follow Us
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर