Champions Trophy 2025 : टीम इंडियाला मोठा झटका, आधीच बुमराह नाही, आता संघातील हा दिग्गजही मायदेशी परतला

चॅम्पियन्स ट्रॉफीसुरू होण्यास अवघा 1 दिवस उरला आहे, मात्र त्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. 20 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या सामन्यांना सुरुवात होत आहे. पण, त्याआधीच भारतीय संघातील एक दिग्गज अचानक मायदेशी परतल्याची बातमी आहे.

Champions Trophy 2025 : टीम इंडियाला मोठा झटका, आधीच बुमराह नाही, आता संघातील हा दिग्गजही मायदेशी परतला
टीम इंडियाला मोठा झटका
Image Credit source: PTI
| Updated on: Feb 18, 2025 | 9:36 AM

ICC चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यास आता अवघा 1 दिवस उरला आहे. 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होणार असून 20 फेब्रुवारीला टीम इंडियाचा पहिला सामना बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे. त्यामुळे सर्व क्रिकेट चाहत्यांचे त्याकडे लक्ष आहे. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीला अजून सुरुवातही झालेली नसनाही टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचे बॉलिंग कोच मॉर्नी मॉर्केल अचानक दुबईहून मायदेशी परतल्याची बातमी आहे. यामागे वैयक्तिक कारण असल्याचे सांगितले जात आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, 17 फेब्रुवारी रोजी टीम इंडियाच्या प्रॅक्टिस सेशनलाही मॉर्केल हे उपस्थित नव्हते.

नेमकं काय झालं ?

16 फेब्रुवारीला दुपारी भारतीय संघ हा आयसीसी अकादमीमध्ये सरावासाठी आला तेव्हा मॉर्नी मॉर्केल हे टीमसमोबतच होते, असे सांगण्यात आले. मात्र, दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू आणि टीम इंडियाचा माजी दिग्गज खेळाडूसोबत नेमके काय झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्याच्याअपवा पसरल्या आहेत. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. तसेच मॉर्केल हे चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय संघ पुन्हा जॉईन करतील की नाही हेही अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मॉर्नी मॉर्केलच्या अनुपस्थितीमुळे टीम इंडियाला झटका

रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा आणि संघातील इतर खेळाडू हे 18 फेब्रुवारी रोजी ट्रेनिंग करणार नाहीत. बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्याच्या एक दिवस अगोदर, 19 फेब्रुवारीला सरावासाठी टीम इंडिया थेट नेटवर धडकेल. भारत आणि बांगलादेश यांच्यात 20 फेब्रुवारीला सामना होणार आहे. जसप्रीत बुमराह आधीच संघात नाहीये, त्याव्यतिरिक्त मोहम्मद शमी देखील लय शोधण्यासाटी चाचपडत आहे. अशा परिस्थितीत दुबईत, टीम इंडियाचा गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्नी मॉर्केल अनुपस्थित असल्याने टीम इंडियाच्या स्पर्धेतील आशा आणखी धुळीस मिळवू शकते.

बांगलादेशनंतर पाकिस्तान आणि न्युझीलंडविरुद्ध होणार लढत

चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरूवात झाल्यावर 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध भारतीय संघाचा पहिला सामना होईल, तर त्यानंतर 23 फेब्रुवारीला भारताची लढत पाकिस्तानशी होणार आहे. आणि 2 मार्च रोजी ग्रुप स्टेजच्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडचा सामना करावा लागणार आहे. भारतीय संघाचे हे सर्व सामने दुबईत होणार आहेत. यानंतर जर टीम इंडिया सेमीफायनल आणि फायनलमध्ये पोहोचली तर ते सामनेही दुबईतच होतील.