सध्या फक्त पंतलाच संधी देण्याचा प्रयत्न, धोनीवर प्रसाद यांचं उत्तर

| Updated on: Jul 21, 2019 | 3:31 PM

रिषभ पंतची भारतीय क्रिकेट संघात निवड करताना निवड समितीचे प्रमुख प्रसाद यांनी आपली भूमिका मांडली. यात प्रसाद यांनी येणाऱ्या काळात पंतला अधिक संधी देणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच धोनीचा वेस्ट इंडिज संघात समावेश नसल्याचेही कारण त्यांनी सांगितले.

सध्या फक्त पंतलाच संधी देण्याचा प्रयत्न, धोनीवर प्रसाद यांचं उत्तर
MS Dhoni Rishabh Pant Dhoni Pant
Follow us on

मुंबई : आयसीसी विश्वचषक 2019 मधून भारताचा संघ बाहेर पडल्यानंतर संघातील बदलांवर चांगलेच वादळ निर्माण झाले होते. अगदी भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीपासून तर कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वापर्यंत बदलाचे आडाखे बांधले जात होते. अखेर आज वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी निवड समितीचे अध्यक्ष एम. एस. के. प्रसाद यांनी संघाची घोषणा केली. यात धोनीच्या जागेवर भारताचा युवा खेळाडू आणि यष्टीरक्षक रिषभ पंतला संधी देण्यात आली आहे.

रिषभ पंतची भारतीय क्रिकेट संघात निवड करताना निवड समितीचे प्रमुख प्रसाद यांनी आपली भूमिका मांडली. यात प्रसाद यांनी येणाऱ्या काळात पंतला अधिक संधी देणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच धोनीचा वेस्ट इंडिज संघात समावेश नसल्याचेही कारण त्यांनी सांगितले. प्रसाद म्हणाले, “धोनी वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी उपलब्ध होऊ शकला नाही. मात्र, आमच्याकडं पुढील विश्वचषकापर्यंतचं निश्चित असं नियोजन आहे. यासोबतच आम्ही पंतला अधिक संधी देण्यासाठी आणि त्याला तयार होण्यासाठीही इतरही काही नियोजन केलं आहे. सध्या तरी आमचं हेच नियोजन आहे.”

भारतीय क्रिकेट संघ आजच्या स्थितीत जगातील सर्वात मजबूत संघापैकी एक आहे. असं असलं तरी पुढील काळातही संघाच्या कामगिरीत सातत्य रहावे आणि नवे खेळाडू तयार व्हावेत यासाठीही बीसीसीआयने कंबर कसली आहे. त्यामुळेच पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवरील वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीच्या भारतीय संघात बदल करण्यात आले. या नव्या संघात सातत्याने चांगली कामगिरी करणाऱ्या काही खेळाडूंनाही विश्रांती देण्यात आली आहे. तसेच खराब कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनाही बाजूला करण्यात आले. या सर्व खेळाडूंच्या जागेवर अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. त्यात श्रेयस अय्यर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, खलील अहमद, राहुल चहर, दिपक चहर, नवदीप सैनी, हनुमा विहारी अशा अनेक खेळाडूंचा समावेश आहे.

भारतीय संघ (टी-20 मालिका)

  • विराट कोहली (कर्णधार)
  • रोहित शर्मा (उप-कर्णधार)
  • शिखर धवन
  • केएल राहुल
  • श्रेयस अय्यर
  • मनिष पांडे
  • रिषभ पंत (यष्टीरक्षक)
  • कृणाल पांडे
  • रविंद्र जाडेजा
  • वॉशिंग्टन सुंदर
  • राहुल चहर
  • भूवनेश्वर कुमार
  • खलील अहमद
  • दीपक चहर
  • नवदीप सैनी

भारतीय संघ (वन-डे मालिका)

  • विराट कोहली (कर्णधार)
  • रोहित शर्मा (उप-कर्णधार)
  • शिखर धवन
  • केएल राहुल
  • श्रेयस अय्यर
  • मनिष पांडे
  • रिषभ पंत (यष्टीरक्षक)
  • कृणाल पांडे
  • रविंद्र जाडेजा
  • कुलदीप यादव
  • युजवेंद्र चहल
  • केदार जाधव
  • मोहम्मद शामी
  • भूवनेश्वर कुमार
  • खलील अहमद
  • नवदीप सैनी

भारतीय संघ (कसोटी मालिका)

  • विराट कोहली (कर्णधार)
  • अजिंक्य राहाणे (उप-कर्णधार)
  • मयांक अग्रवाल
  • के. एल. राहुल
  • सी. पुजारा
  • हनुमा विहारी
  • रोहित शर्मा
  • रिषभ पंत (यष्टीरक्षक)
  • रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक)
  • आर. अश्वीन
  • रविंद्र जाडेजा
  • इशांत शर्मा
  • मोहम्मद शामी
  • जसप्रित बुमराह
  • उमेश यादव