प्रज्ञान ओझाला बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक का बनवलं? खेळाडूंच्या निवडसाठी करण्यासाठी नाही तर ‘या’ कामासाठी

Pragyan Ojha News: प्रज्ञान ओझा पूर्णवेळ मुख्य निवडकर्ता बनले आहेत. पण बीसीसीआयने ही जबाबदारी प्रज्ञान ओझावर का टाकली यामागचे कारणही आता समोर आले आहे.

प्रज्ञान ओझाला बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक का बनवलं? खेळाडूंच्या निवडसाठी करण्यासाठी नाही तर या कामासाठी
| Updated on: Oct 20, 2026 | 1:54 PM
Pragyan Ojha Cheif Selector:  प्रज्ञान ओझा पूर्णवेळ मुख्य निवडकर्ता बनले आहेत. रमेश पोवार भारतीय संघाच्या निवड समितीत सामील झाले आहेत. आता प्रज्ञान यांची या पदावर एका महत्त्वपूर्ण कारणास्तव नियुक्ती करण्यात आली आहे आणि त्यामागील कहाणी खूपच रंजक आहे. असे वृत्त आहे की, वरिष्ठ खेळाडू आणि संघ व्यवस्थापन यांच्यातील दरी कमी करण्याची जबाबदारी प्रज्ञान यांच्यावर होती. बीसीसीआयने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील मतभेद मिटवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपवली होती.
प्रज्ञान ओझांकडेच मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी का?

प्रज्ञान ओझा भारतीय संघात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासोबत खेळले आहेत. ते आयपीएलमध्ये डेक्कन चार्जर्सकडून रोहितसोबतही खेळले होते. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, प्रज्ञान यांचे सध्याच्या वरिष्ठ खेळाडूंशी चांगले संबंध आहेत आणि बीसीसीआयने हे सुनिश्चित केले की या चांगल्या संबंधांचा उपयोग एका चांगल्या कार्यासाठी केला जाईल.

संघात वरिष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षक कमिटीमध्ये वाद असल्याचे अनेक वाद समोर आले आहेत. संघातील हे वातावरण कमी करुन ते मैत्रीत रुपांतर करण्याचे काम हे प्रज्ञान ओझांकडे सोपवण्यात आले असल्याचे म्हटले जात आहे.

Loading...

आता, मुख्य निवडकर्ता बनल्यानंतर प्रज्ञान ओझा यांच्यासमोर एक मोठे आव्हान आहे. २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक एका वर्षापेक्षा कमी कालावधीवर आला आहे. विशेषतः गोलंदाजीच्या खराब कामगिरीवर तोडगा काढणे, ही पुढील वर्षभरात निवड समितीसाठी सर्वात मोठी डोकेदुखी असेल. भारतीय संघाच्या गोलंदाजी विभागात एकदिवसीय सामन्यांच्या अनुभवाची तीव्र कमतरता आहे.

 

यापूर्वी अजित आगरकर यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत होते. आगरकरांचा हा कार्यकाळ खूप चर्चेचा विषय बनला होता. आगकरांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक आश्चर्यकारक निर्णय घेतले होते. अनेक खेळाडूंनी त्यांच्या कार्यकाळात निवृत्ती ही घेतली. अनेक नवीन खेळाडूंना संघात संधी मिळाली. आता प्रज्ञान ओझा यांच्या कार्यकाळात भारतीय संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us