CWG 2022, Triple Jump : भारताने तिहेरी उडीत इतिहास रचला, अल्डोस पॉलनं सुवर्ण, अब्दुल्लानं रौप्यपदक जिंकलं

| Updated on: Aug 07, 2022 | 5:09 PM

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. तिहेरी उडी स्पर्धेत भारताने प्रथमच सुवर्णपदक जिंकले आहे. भारताच्या अल्डोस पॉलने देशासाठी सुवर्णपदक जिंकले. अब्दुल्लाने रौप्यपदकावर कब्जा केला.

CWG 2022, Triple Jump : भारताने तिहेरी उडीत इतिहास रचला, अल्डोस पॉलनं सुवर्ण, अब्दुल्लानं रौप्यपदक जिंकलं
तिहेरी उडीत भारताला सुवर्ण आणि रौप्य पदक मिळाले
Image Credit source: social
Follow us on

नवी दिल्ली : 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत (CWG 2022) भारतीय खेळाडूंनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. तिहेरी उडी स्पर्धेत (Triple Jump) भारताने प्रथमच सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले आहे. भारताच्या अल्डोस पॉलने देशासाठी सुवर्णपदक जिंकले. त्याचवेळी भारतीय खेळाडू अब्दुल्लाने रौप्यपदकावर कब्जा केला. आणखी एक भारतीय खेळाडू प्रवीणचे कांस्यपदक हुकले. तो चौथ्या क्रमांकावर होता. पॉलने 17.03 मीटर उडी मारून पहिले स्थान मिळविले. त्याचवेळी, भारताचा दुसरा अ‍ॅथलीट अब्दुल्ला अबुबकर अवघ्या .01 च्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर राहिला. अब्दुल्लाने 17.02 मीटर उडी मारली. पॉलने पहिल्याच प्रयत्नात केवळ 14.62 मीटर उडी मारली. यानंतर पुढच्या प्रयत्नात त्याने 16.30 मीटर अंतर गाठले. त्यानंतर पॉलने 17.03 मीटर उडी मारून सर्वांना आश्चर्यचकित केले. अब्दुल्ला अबुबाकरबद्दल सांगायचे तर, त्याने चौथ्या प्रयत्नापर्यंत केवळ 16.70 मीटर उडी मारली, परंतु पाचव्या प्रयत्नात या खेळाडूने 17.02 मीटर उडी मारून दुसरा क्रमांक पटकावला. अशा प्रकारे अब्दुल्लाने रौप्य पदक जिंकले.

भारताने तिहेरी उडीत इतिहास रचला

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या तिहेरी उडीत भारताला प्रथमच सुवर्णपदक मिळाले. त्याचबरोबर भारताने केवळ दुसऱ्यांदा रौप्यपदक जिंकले आहे.

हायलाईट्स

  1. पॉलने 17.03 मीटर उडी मारून पहिले स्थान मिळविले
  2. भारताचा दुसरा अ‍ॅथलीट अब्दुल्ला अबुबकर अवघ्या .01 च्या फरकाने दुसऱ्या क्रमांकावर राहिला
  3. अब्दुल्लाने 17.02 मीटर उडी मारली. पॉलने पहिल्याच प्रयत्नात केवळ 14.62 मीटर उडी मारली. यानंतर पुढच्या प्रयत्नात त्याने 16.30 मीटर अंतर गाठले.
  4. पॉलने 17.03 मीटर उडी मारून सर्वांना आश्चर्यचकित केले.
  5. अब्दुल्ला अबुबाकरबद्दल सांगायचे तर त्याने चौथ्या प्रयत्नापर्यंत केवळ 16.70 मीटर उडी मारली
  6. पाचव्या प्रयत्नात या खेळाडूने 17.02 मीटर उडी मारून दुसरा क्रमांक पटकावला.

मोहिंदर सिंग गिलने 1970 मध्ये पहिल्यांदा कांस्यपदक जिंकले होते. यानंतर 1974 मध्ये मोहिंदर सिंग गिलला रौप्य पदक मिळाले. 2010 मध्ये रणजीत माहेश्वरी आणि 2014 मध्ये अरपिंदर सिंगने कांस्यपदक जिंकले होते. आता पॉलने सुवर्ण आणि अब्दुल्लाने रौप्य जिंकून इतिहास रचला आहे.