कॉमनवेल्थ गेम्स (CWG) लेटेस्ट न्यूज: भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. नऊ मेडल्स जिंकली आहेत. आजही भारताच्या खात्यात जास्तीत जास्त पदकं जमा होतील, अशी अपेक्षा आहे. लॉन बॉल्स मध्ये भारतीय महिला टीमने पदक निश्चित केलं आहे. ते आज फायनल मध्ये खेळतील. दक्षिण आफ्रिकेला हरवून सुवर्णपदक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
भारताच्या विकास ठाकूरने 96 किलो वजनीगटात रौप्यपदक जिंकलं आहे. त्याने स्नॅच मध्ये 155 किलो वजन उचललं. त्यानंतर क्लीन अँड जर्क मध्ये 191 किलो वजन उचललं. एकूण 346 किलो वजनासह तो दुसऱ्या स्थानावर राहिला. समोराच्या डॉन ओपलोगने गोल्ड मेडल मिळवलं.
भारताने २०१८च्या गोल्ड कोस्टमध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये या इव्हेंटमध्ये दुसऱ्यांदा गोल्ड मिळवले होते. आता तिसऱ्यांदा हे गोल्ड मिळवण्याची कामगिरी भारताने केली आहे. २०१८ सालाप्रमाणेच यावेळीही भारतीय टीममध्ये अंचरता शरत कम, जी साथीयन, हरमीत देसाई आणि सुनील शेट्टी होते.
10 मेडल्ससह भारत सध्या पदकतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. चार सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 ब्राँझ मेडल्स भारताने मिळवली आहेत.
ऐतिहासिक. भारतीय महिला टीमने पहिल्यांदाच Lawn Bowl मध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर 17-10 असा विजय मिळवला.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये लॉन बॉलची फायनल सुरु आहे. 14 व्या एन्ड मध्ये भारतीय संघाने 3 पॉइंटस मिळवले आहेत. भारताची आता दक्षिण आफ्रिकेवर 15-10 अशी आघाडी झाली आहे.
टेबल टेनिस फायनल: भारताची सिंगापूरवर 1-0 आघाडी.
पुरुष दुहेरीत भारत आणि सिंगापूर मध्ये टेबल टेनिसची फायनल सुरु आहे.
12 व्या राऊंड नंतर भारताने पुनरागमन केलं आहे. दोन्ही संघांचे स्कोर आता 10-10 असे बरोबरीत आहेत.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील अंतिम सामना रोमांचक झाला आहे. 10 व्या राऊंड नंतर दक्षिण आफ्रिकेने 8-8 अशी बरोबरी केली आहे.
एथलॅटिक्स: महिलांच्या धावण्याच्या 100 मीटर शर्यतीत राऊंड 1 मध्ये भारताच्या द्युती चंदला चौथ्या स्थानावर समाधान मानाव लागलं. ती सेमी फायनलसाठी प्रवेश करण्यात अपयशी ठरली.
लॉन बॉल मध्ये भारतीय महिला संघ इतिहास रचण्याच्या जवळ पोहोचला आहे. तिसऱ्या राऊंड मध्ये स्कोर बरोबरीत होता. त्यानंतर महिला संघाने आघाडी वाढवायला सुरुवात केली. आता 6 राऊंड नंतर स्कोर 7-2 आहे. म्हणजे मजबूत आघाडी आहे.
– ज्या शिवसैनिकांनी अडीच वर्षे त्रास भोगला आहे, एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लावला जाणार नाही
– राज्याला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन
– आम्ही अडीच वर्षांपूर्वी जे केले ते आता केलं
– बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आणायला पाहिजे होते ते आम्ही केलं
– मग विश्वासघात कुणी केला आम्ही केला का हे जनता ठरवेल
भारत आणि दक्षिण आफ्रिकेत लॉन बॉलची फायनल सुरु आहे. अटी-तटीचा सामना सुरु आहे. तिसऱ्या राऊंड नंतर दोन्ही टीम्स 2-2 अशा बरोबरीत आहेत. पहिल्या राऊंड मध्ये भारताने आघाडी मिळवली होती. पण दुसऱ्या राऊंड मध्ये दक्षिण आफ्रिकेने आघाडी घेतली. तिसऱ्या राऊंड मध्ये भारताने बरोबरी साधली.
भारताच्या मनप्रीत कौरने महिला शॉटपुटच्या फायनलसाठी क्वालिफाय केलं आहे. 16.78 मीटरचा तिचा बेस्ट थ्रो होता. ती सातव्या स्थानावर होती.
– उद्धवसाहेब तुम्हाला एसटी स्टँडसाठी बारामतीला देण्यासाठी 200 कोटी होते, मग पाणी पुरवठा योजनेसाठी का पैसे दिले नाहीत
– उद्धवसाहेब तुम्ही मतदारांचा अपमान केला।
– भाईंच्या रूपाने देव मिळला, पुढच्या अडीच वर्षे काय झालं असतं माहीत नाही
– महाविकास आघाडीचे नतद्रष्ट सरकार होते
– यांनी जे 3 वर्षात अन्याय केला भाईंनी ते 30 दिवसात मिटवला
– मावळमध्ये मी काम केलं त्यानंतर अजित पवारांनी भर सभेत विजय शिवातरे कसा निवडून येतो बघतोच म्हणालेत
– संजय राऊत आणि मिर्लेकर यांनी हवेलीत पैसे घेतले आणि पालिका निवडणुकीत चुकीचा माणसाला तिकीट दिलं
पूनम यादव पूर्णपणे फेल झाली आहे. क्लीन अँड जर्क मध्ये तीन पैकी एकाही प्रयत्नात ती यशस्वी झाली नाही.
पुरुषांच्या लांब उडीत भारताचा मोहम्मद अनस याहियाने 7.68 मीटर अंतरावर उडी मारली. त्याने अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्याने आपल्या हीट मध्ये तिसरं स्थान मिळवलं.
जलतरणात श्रीहरी नटराजने 200 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये तिसरं स्थान मिळवलं.
भारताच्या श्रीशंकरने 8.05 मीटर लांब उडी मारली. पुरुषांच्या लांब उडी मध्ये अंतिम फेरीसाठी तो पात्र ठरलाय.
महिला ट्रिपल्स मध्ये भारतीय टीमने न्यूझीलंडवर 13 राऊंडस संपल्यानंतर 12-8 अशी आघाडी घेतली आहे.
पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.
जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी.
विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना
पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम त्वरित पूर्ण करावे.
शासनाच्या मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.
दरड प्रवण गावातील तात्पुरते स्थलांतर केलेल्या नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्यात याव्यात.
प्राणहानी व घरांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आवश्यक निधीची मागणी करण्यात यावी
पूनम 76 किलो वजनी गटात चांगली सुरुवात करु शकली नाही. ती 95 किलो वजन उचलण्याच्या पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरली. तिसऱ्या प्रयत्नात तिने 98 किलो वजन उचललं.